शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
2
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
3
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
4
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
5
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
6
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
7
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
8
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
9
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
10
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
12
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
13
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
14
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
15
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
16
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
17
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
19
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
20
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."

परभणी मनपा आरक्षण निश्चित; 'खुला' प्रवर्गाची जागा वाढताच एकच जल्लोष, तर काहींचा हिरमोड

By राजन मगरुळकर | Updated: November 11, 2025 12:50 IST

परभणी महापालिका ६५ जागांसाठी आरक्षण सोडत; काही इच्छुक आनंदी, तर काहींच्या स्वप्नांवर पाणी

परभणी : शहर महापालिकेच्या संभाव्य २०२५ च्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी बी.रघुनाथ सभागृह येथे आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम जाहीर झाला. यामध्ये एकूण ६५ जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. मागील २०१७ च्या निवडणुकीनंतर यंदा खुला प्रवर्गासाठी एक जागा वाढली तर नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी एक जागा घटली आहे. यासह विविध प्रवर्गातील जागांचे आरक्षण निश्चित झाले. 'कही खुशी कही गम' असे चित्र या आरक्षण निश्चितीनंतर पहावयास मिळाले.   

परभणी शहर महापालिकेच्या वतीने मंगळवारी आयुक्त तथा प्रशासक नितीन नार्वेकर, नगरसचिव विकास रत्नपारखे, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, शहर अभियंता वसीम पठान, संगणक विभाग प्रमुख अदनान कादरी, पवन देशमुख,  राजकुमार जाधव यांच्यासह प्रमुख अधिकारी, विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली. 

मनपामध्ये एकूण ६५ जागा सदस्यांसाठी असून या जागांमध्ये खुला प्रवर्ग, खुला प्रवर्ग महिला, अनुसुचित जाती, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अशा प्रवर्गांचे आरक्षण निश्चित झाले. या आरक्षण सोडवतील ऐकण्यासाठी व आरक्षण निश्चित प्रक्रियेसाठी शहरातील इच्छुक उमेदवारांनी बी रघुनाथ सभागृह येथे गर्दी केली होती. एक एक प्रभागाचे आरक्षण निश्चित होताच इच्छुकांनी आपल्या मनाप्रमाणे आरक्षण निघाल्यास जल्लोष केला तर काहींनी हिरमोड झाल्याने सभागृहातून काढता पाय घेतला. विशेष करून युवकांचा जल्लोष अधिक प्रमाणात होता.    मनपा संभाव्य सदस्यांसाठी जागांचे आरक्षण सन २०२५ ची सध्याची स्थिती एकूण ६५खूला २०खूला महिला - १९एससी ८ (४ महिला)एसटी १ (महिला)ओबीसी १७ (९ महिला)

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Municipal Corporation reservation finalized; joy over increased open category seats.

Web Summary : Parbhani Municipal Corporation's 2025 election reservation draw occurred. Open category seats increased, OBC seats decreased. Jubilation and disappointment marked the event as candidates learned their fate. Total seats are 65.
टॅग्स :parabhaniपरभणीMunicipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक 2024