शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

परभणी महापालिकेने दिली बांधकामे अधिकृत करण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:26 IST

शहरातील मालमत्ता करात वाढ करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता अनाधिकृत बांधकामे नियमित करण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे़ त्यामुळे नागरिकांना अनाधिकृत बांधकामाच्या घरपट्टीपोटी भरावयाच्या शास्तीच्या रकमेतून सुटकारा मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे़ परभणी महान

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील मालमत्ता करात वाढ करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता अनाधिकृत बांधकामे नियमित करण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे़ त्यामुळे नागरिकांना अनाधिकृत बांधकामाच्या घरपट्टीपोटी भरावयाच्या शास्तीच्या रकमेतून सुटकारा मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे़परभणी महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी मनपा प्रशासनाने शहरातील मालमत्तांच्या सर्वेक्षणाचा निर्णय घेतला़ मागील अनेक वर्षांपासून मालमत्तांचे सर्वेक्षण झाले नसल्याने घरपट्टीपोटी मनपाला मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत होते़ या पार्श्वभूमीवर मागील वर्षी महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाºयांनी शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण केले़ या सर्वेक्षणानंतर मालमत्ता करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला़ त्यानुसार शहरातील मालमत्तांचे कर निश्चित करण्यात आले़ हे कर ठरवित असताना अनाधिकृत बांधकामांना घरपट्टीच्या दुप्पट दंड आकारण्याची तरतूद आहे़ त्यामुळे अनाधिकृत बांधकामधारकांना मोठ्या प्रमाणात भुर्दंड सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली होती़दरम्यान, या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अनाधिकृत मालमत्तांना अधिकृत करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे़ महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५२ क नुसार अनाधिकृत बांधकामे प्रशमन आकार लावून प्रश्मीत संरचना म्हणून घोषित केली जाणार आहे़ या निर्णयानुसार परभणी शहरातील अनाधिकृत बांधकामांसंदर्भात बांधकाम देखरेख अभियंते आणि आर्किटेक्ट यांची बैठक घेण्यात आली़ शासनाच्या निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची बांधकामे नियमित करण्यासाठी अनाधिकृत बांधकाम धारकांकडून महानगरपलिकेने अर्ज मागविले आहेत़हे अर्ज महापालिकेच्या आवक विभागात विहित नमुन्यात स्वीकारले जाणार आहेत़ ११ डिसेंबर २०१७ ते ३० एप्रिल २०१८ या कालावधीत अनाधिकृत बांधकाम धारकांकडून बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज स्वीकारले जातील़ मनपाचा परवाना असलेल्या आर्किटेक्ट मार्फत महापालिका कार्यालयातून १५० रुपयांचा अर्ज उपलब्ध करून दिला जाईल़ या अर्जासोबत कागदपत्रांची यादी दिली आहे़ सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपलब्ध अर्ज दाखल झाल्यानंतर या बांधकामांना नियमित केले जाणार आहे़६० टक्के बांधकामे अनाधिकृतमहानगरपालिकेच्या नोंदीनुसार एक वर्षापूर्वी शहरात ३३ हजार मालमत्ता होत्या़ मागील वर्षी या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला़ सर्वेक्षणाअंती मालमत्तांची संख्या ७३ हजार एवढी झाली आहे़ शहरात ६० टक्के बांधकामे अनाधिकृत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे़ महापालिका अनाधिकृत बांधकामांसंदर्भात सर्वेक्षण करीत आहे़ बांधकाम परवाना न घेता बांधकाम करणे किंवा बांधकाम परवान्यातील नकाशात नमूद केलेल्या बांधकामापेक्षा अधिक झालेले बांधकाम अनाधिकृत ठरविले जाते़अधिकाºयांच्या मार्गदर्शनाची गरज४बांधकाम परवाना काढणे तसेच नियमित करणे या संदर्भात नागरिकांना प्रक्रियेची माहिती नाही़ त्यामुळे बांधकामे नियमित करण्यासाठी लागणाºया प्रक्रियेची इत्यंभूत माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाºयांनी जनजागरण करावे, अशी मागणी होत आहे.दंडाच्या रकमेपासून मिळू शकते सुटकाशहरामध्ये घरपट्टी वसूल करताना अनाधिकृत बांधकामांसाठी १०० टक्के दंड (शास्ती) लावण्याची तरतूद आहे़ त्यामुळे जेवढी घरपट्टी तेवढाच दंड मनपा प्रशासन वसूल करू शकते़ काही दिवसांपूर्वीच महानगरपालिकेने घरपट्टीमध्ये वाढ केली आहे़ कोणत्या अनाधिकृत मालमत्तांना किती शास्ती लावायची याविषयी शासन निर्णय असले तरी अनाधिकृत मालमत्तांना दंड लागणार आहे़ महानगरपालिकेने अनाधिकृत बांधकामे नियमित करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने परभणी शहरातील नागरिकांची दंडाच्या रकमेपासून सुटका होऊ शकतो़