शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

परभणी: मुद्गल बंधारा मृत साठ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:48 IST

गोदावरी नदीपात्रातील मुदगल बंधाऱ्याची सध्या पाणीपातळी पूर्णत: खालावली असून हा बंधारा मृत साठ्यात गेला आहे. त्यामुळे पाथरी शहराच्या पाण्याच्या प्रश्नासह २ हजार २४२ हेक्टवरील शेत जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : गोदावरी नदीपात्रातील मुदगल बंधाऱ्याची सध्या पाणीपातळी पूर्णत: खालावली असून हा बंधारा मृत साठ्यात गेला आहे. त्यामुळे पाथरी शहराच्या पाण्याच्या प्रश्नासह २ हजार २४२ हेक्टवरील शेत जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.पाथरी तालुक्यात मागील तीन ते चार वर्षापासून दरवर्षी अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यावर्षीही पूर्ण पावसाळ्यात केवळ दोन महिने पाऊस पडला. तर सप्टेंबर, आॅक्टोबर ही दोन महिने पूर्णत: कोरडी गेली आहेत. ५० टक्के कमी पाऊस झाल्याने यावर्षी तालुक्यात राज्य शासनाने गंभीर दुष्काळ जाहीर केला. तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल या दोन ठिकाणी गोदावरी नदीपात्रात उच्च पातळीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. ढालेगाव येथील बंधाऱ्याची पाणीसाठवण क्षमता १४.८७ दलघमी आहे. तर मुदगलची ११.४८ दलघमी एवढी क्षमता आहे. मागील काही वर्षापासून पाऊस कमी पडत असल्याने दरवर्षी हे बंधारे मार्च महिन्यापूर्वीच कोरडे पडत आहेत. गतवर्षी कमी पाऊस झाल्याने ढालेगाव बंधारा जायकवाडीच्या पाण्यामुळे १०० टक्के भरला गेला होता. मात्र आॅगस्ट नंतर पाऊसच पडला नसल्याने पावसाळ्यातच बंधाºयाचे पाणी ५० टक्के पेक्षा कमी झाले होते. याचा फटका खरीप पिकांसोबत रबी हंगामातील पिकांनाही बसला होता. आॅक्टोबर ते मार्च या कालावधीत बंधाºयात पाण्याचा बराच उपसा सिंचनासाठी झाला. त्याच बरोबर काही दिवसात वाढलेल्या तापमानामुळे होणारे बाष्पीभवन यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. मुदगल येथील बंधारा तर सध्या मृत साठ्यात आहे.त्याच बरोबर ढालेगाव येथील बंधाºयातही मार्च महिन्यात पाणी पातळी ३९०.१०० मीटर म्हणजेच ३.२४ टक्केच आहे. या पाण्यावर पाथरी शहराचा पुढील तीन महिन्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे; परंतु, मृतसाठ्यात असलेल्या या बंधाºयातून शेती सिंचनासाठी पाण्याचा उपसा सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होणार आहे. त्याच बरोबर २ हजार २४२ हेक्टवरील पिकांनाही मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.जायकवाडीच्या: पाण्यावरच मदार४तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात दोन बंधारे आहेत. त्याच बरोबर जायकवाडी धरणाचा डावा कालवा या भागातून गेला आहे. त्यामुळे या भागात बारमाही सिंचन सुविधा उपलब्ध असल्या तरी निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना बागायती पिकांना पाणी मिळत नाही.४जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर या भागात मोठे सिंचन होते. आॅक्टोबर महिन्यात जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून संरक्षित पाणीपाळी सोडण्यात आली. त्यानंतर जानेवारी महिन्याच्या शेवटी या भागात एक पाणी आवर्तन सोडण्यात आले. या पाण्यावर ४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. त्याच बरोबर कालव्यातील पाण्यामुळे सिंचनाच्या स्त्रोताला पाणी राहिले आहे.४त्यामुळे बºयाच अंशी जायकवाडीच्या पाण्याने पाथरी तालुक्याला तारले असल्याचे दिसून येत आहे.सिंचनाचा प्रश्न ऐरणीवरढालेगाव बंधारा कार्यक्षेत्रांंतर्गत ढालेगाव, रामपुरी, निवळी, पाटोदा, गोपेगाव, मरडसगाव, बानेगाव, मंजरथ तर माजलगाव तालुक्यातील पिंपळगाव, पुरुषोत्तम पुरी, जायक्याचीवाडी, सादोळा, गंगामसला, सावंगी यासह इतर गावातील २ हजार २४२ हेक्टर शेती सिंचनाखाली येते; परंतु, मार्च महिन्यात या बंधाºयात केवळ ६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे भविष्यात बंधारा कार्यक्षेत्रात येणाºया पाथरी व माजलगाव तालुक्यातील शेती सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater scarcityपाणी टंचाई