शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

परभणी : बारदाना गायब प्रकरणी चौकशी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:41 IST

येथील बचत भवन इमारत परिसरातून चोरीला गेलेले बारदाने आणि इमारतीतील लोखंड व इतर साहित्याच्या चोरी प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील बचत भवन इमारत परिसरातून चोरीला गेलेले बारदाने आणि इमारतीतील लोखंड व इतर साहित्याच्या चोरी प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला़येथील बी़ रघुनाथ सभागृहात २५ जुलै रोजी महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली़ यावेळी उपमहापौर माजू लाला, आयुक्त रमेश पवार, नगरसचिव विकास रत्नपारखी यांची उपस्थिती होती़ या सर्वसाधारण सभेत ४२ विषय चर्चेसाठी ठेवले होते़बॅडमिंटन हॉलसमोरील बचत भवनची जागा जिल्हा क्रीडा संकुलासाठी वर्ग करण्याचा विषय चर्चेला आल्यानंतर या विषयावर चर्चा होत असताना नगरसेवक एस़एम़ अली पाशा, राष्ट्रवादीचे गटनेते जलालोद्दीन काजी, हन्नूभाई आदींनी बचतभवन परिसरातून चोरीला गेलेल्या बारदाण्याचा तसेच या परिसरातील इमारतीतील लोखंड व इतर साहित्याच्या अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला़ या प्रकरणी समिती नियुक्त करून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली़ काही नगरसेवकांनी इमारत जमीनदोस्त करण्यासाठी झालेल्या खर्चाचा मुद्दा उपस्थित केला़ त्यावर नवीन नाट्यगृहासाठी मंजूर झालेल्या निधीपैकी काही निधी ही इमारत पाडण्यासाठी राखीव असल्याचे सांगत मनपाने जिल्हाधिकारी तथा तत्कालीन आयुक्त पी़ शिव शंकर यांच्या आदेशावरून इमारत जमीनदोस्त केल्याचे यावेळी सांगितले़दरम्यान, ही इमारत पाडत असताना नियमांचे पालन झाले नाही़ इमारतीतील साहित्याची नोंद झाली नाही, असा आरोप करीत चौकशी समिती नेमण्याची मागणी करण्यात आली़ त्यावर नगरसेवक, मनपा अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला़ या सभेत स्थायी समितीचे सभापती गणेश देशमुख, समाजकल्याण सभापती नागेश सोनपसारे, नगरसेवक अतुल सरोदे, प्रशास ठाकूर, सुशील कांबळे, मोकींद खिल्लारे, डॉ़ विद्या पाटील आदींनी चर्चेत सहभाग नोंदविला़ सकाळी ११ वाजता सुरू झालेली सर्वसाधारण दुपारी ३़३० वाजेच्या सुमारास संपली़रोजंदारी कर्मचाºयांना कायम करामहापालिकेत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना आकृती बंदातील रिक्त मंजूर पदांवर सामावून घेण्याचा ठराव घेण्यात आला़ त्यावर नगरसेवक सचिन देशमुख, नगरसेविका जयश्री खोबे यांनी रोजंदारी कर्मचाºयांचा प्रश्न उपस्थित केला़ महापालिकेत ३० वर्षांपासून सेवा देणाºया या कर्मचाºयांना मनपाच्या सेवेत कायम केले पाहिजे, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला़ कंत्राटी कर्मचाºयांच्या शिफारशीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याबरोबरच रोजंदारी कर्मचाºयांनाही सेवेत कायम करावे, अशी मागणी केली़ नगरसेवक सुनील देशमुख, सचिन अंबिलवादे यांनीही हा प्रश्न उचलून धरला़ तसेच नगरसेवक सचिन देशमुख यांनी शासनाच्या निर्णयानुसार मंजूर पदांमध्ये मराठा व मुस्लीम आरक्षण ठेवावे, अशी सूचना केली़ परभणी महापालिकेत रिक्त पदांचा प्रश्न निर्माण झाला आहे़ कंत्राटी कर्मचाºयांकडून कामे करून घेतली जात आहेत़ त्याच जोडीला परभणी महापालिकेतून इतर ठिकाणी बदली झालेल्या कर्मचाºयांना प्रतिनियुक्तीवर बोलवावे, तसेच निलंबित कर्मचाºयांना परत कामावर घ्यावे, अशाही सूचना नगरसेवकांनी केल्या़जागा हस्तांतराला विरोधपरभणीतील प्रस्तावित नाट्यगृहासाठी बचत भवन ऐवजी इतर ठिकाणी जागा दिली जाईल, असे जिल्हाधिकाºयांनी दोन दिवसांपूर्वी महापालिकेला कळविले आहे़ त्यानुसार बचत भवन परिसरातील बॅडमिंटन हॉलसमोरील जागा क्रीडा संकुलाला वर्ग करण्याचा विषय सभेत ठेवण्यात आला़ परंतु, या विषयाला काही नगरसेवकांनी विरोध केला़ तर नगरसेवक सुनील देशमुख यांनी मात्र ही जागा क्रीडा संकुलाकडे वर्ग करावी, अशी मागणी केली़ तात्पुरता हा ठराव प्रलंबित ठेवण्यात आला असला तरी नवीन नाट्यगृहाची निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे बैठकीत ठरले़स्थायी समितीच्या सदस्यांची निवडस्थायी समितीच्या मागील सभेत आठ सदस्य निवृत्त झाल्याने या सभेत नवीन आठ सदस्यांची निवड करण्यात आली़ त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख फाहद शेख हमीद, बालासाहेब बुलबुले, काँग्रेसचे गुलमीर खान, जाहेदा बेगम इब्राहीम, कमलाबाई काकडे, पठाण नाजनीन, भाजपाच्या उषाताई झांबड, डॉ़ विद्या पाटील, शिवसेनेचे प्रशास ठाकूर यांची स्थायी समिती सदस्य म्हणून निवड झाल्याचे महापौर मीनाताई वरपूडकर यांनी जाहीर केले़जिल्हाधिकाºयांना निलंबित कराबचत भवनच्या प्रश्नावर चर्चा करीत असताना नगरसेवक लियाकत अली अन्सारी यांनी सांगितले की, जिल्हाधिकाºयांनी बचत भवनची इमारत पाडण्याचे चुकीच्या पद्धतीने आदेश दिले असून, नियमांचे पालन झाले नाही़ इमारतीच्या हस्तांतराचा कागदोपत्री योग्य तो व्यवहार झाला नाही़ त्यामुळेच हा घोटाळा झाला़ या सर्व प्रकरणास जबाबदार धरून जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांना निलंबित करावे, अशी मागणी सर्वसाधारण सभेत केली़

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाcollectorजिल्हाधिकारी