शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत बैठक :धनगर आरक्षणासाठी पंतप्रधानांना भेटणार- राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:04 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याचा मुद्दा केंद्र शासनाच्या अखत्यारित असून, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती राज्याचे जलसंधारण व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री प्रा़ राम शिंदे यांनी येथे एका बैठकीत बोलताना दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याचा मुद्दा केंद्र शासनाच्या अखत्यारित असून, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती राज्याचे जलसंधारण व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री प्रा़ राम शिंदे यांनी येथे एका बैठकीत बोलताना दिली़मुंबईहून परभणीमार्गे परळीला कार्यक्रमाला जाण्यासाठी शिंदे यांचे बुधवारी सकाळी ७़३० वाजता परभणीत देवगिरी एक्सप्रेस रेल्वेने आगमन झाले़ यावेळी त्यांनी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या निवासस्थानी भेट दिली़ यावेळी धनगर समाजातील कार्यकर्त्यांशी अनौपचारिक बैठक झाली़ याबैठकीत भुमरे यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली़ समाजाची भावना लक्षात घेऊन या प्रकरणी राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी भुमरे यांनी केली़ याशिवाय अन्य तीन ते चार जणांनीही मनोगत व्यक्त करताना आरक्षणाची मागणी केली़ त्यावर जलसंधारण व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री राम शिंदे यांनी राज्य शासन धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे़ परंतु, या संदर्भातील विषय केंद्र शासनाच्या अखत्यारित येतो़ त्यामुळे लवकरच या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेणार असल्याचे ते म्हणाले़ यावेळी आ़ मोहन फड, माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, विठ्ठल रबदडे, मारोती बनसोडे, हरिभाऊ शेळके, रामप्रसाद रौंदळे, भागवत बाजगीर, अनंतराव बनसोडे, दत्तराव घोरपडे, जगदीश केंद्रे, लिंबाजी पुंजारे, आण्णा डिघोळे आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीreservationआरक्षणRam Shindeप्रा. राम शिंदे