शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : राष्ट्रवादीच्या बैठकीत नावावर मतैऐक्य होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:48 IST

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून घेण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या मुंबई येथील बैठकीत चार इच्छुकांची नावे कायम असल्याने नावाबाबत मतैऐक्य झाले नसल्याची बाब शुक्रवारी स्पष्ट झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून घेण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या मुंबई येथील बैठकीत चार इच्छुकांची नावे कायम असल्याने नावाबाबत मतैऐक्य झाले नसल्याची बाब शुक्रवारी स्पष्ट झाली.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीची शुक्रवारी मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत परभणी लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची पुन्हा एकदा चाचपणी करण्यात आली. यावेळी पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ, खा.सुप्रिया सुळे आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली. पक्षाचे परभणी महानगराध्यक्ष स्वराजसिंह परिहार आणि माजी महापौर प्रताप देशमुख यांनी माजी जि.प.उपाध्यक्ष बाळासाहेब जामकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. जामकर यांचे नेटवर्क व जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास पक्षाला फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले. माजी खा.सुरेश जाधव यांनीही आपणास उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी आ. विजय भांबळे यांच्या नावावरची चर्चा झाली; परंतु भांबळे यांनीच याबाबत अनुत्सुकता दाखविली. परभणीच्या जागेसाठी चार इच्छुकांची नावे आल्याने व एका नावावर मतैऐक्य होत नसल्याने उमेदवाराची निश्चिती पक्षश्रेष्ठींनीच करण्याचा निर्णय यावेळी घेतला. याबाबतच्या नावाची घोषणा नंतर केली जाईल, असे सांगण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, अनिल नखाते, अशोक काकडे, राजेंद्र लहाने, अजय चौधरी, किरण सोनटक्के आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस