लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): हुंड्यातील राहिलेले दहा हजार रुपये घेऊन ये असे म्हणून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ करुन घराबाहेर हालकून दिल्याने गंगाखेड पोलीस ठाण्यात ३ जानेवारी रोजी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील ममता कॉलनी परिसरात राहणाऱ्या रेश्मा शेख शाहरुख (२१) यांचा विवाह २५ मे २०१७ रोजी झाला. त्यानंतर एक महिना चांगले नांदविले. त्यानंतर पती शेख शाहरुख शेख अनवर, सासू मुमताज शेख अनवर, भाया शेख अकबर शेख अनवर, दीर शेख सद्दाम शेख अनवर, शेख जावेद शेख अनवर, शेख महेमुद शेख अनवर, हिना शेख अकबर, शेख खालेद यांनी संगनमत करुन तुझ्या आईने हुंड्याच्या २५ हजार रुपयांतील १५ हजार रुपये दिले, राहिलेले १० हजार रुपये घेऊन ये म्हणून शिवीगाळ करीत मारहाण केली. त्याच बरोबर शारीरिक व मानसिक छळ करुन तुझे वागणे बरोबर नाही, असे म्हणून १२ आॅक्टोबर २०१८ रोजी मारहाण करुन घराबाहेर हाकलून दिले. हुंड्यातील राहिलेले पैसे आणल्याशिवाय घरात येऊ नको, अशी धमकी दिल्याची फिर्याद ३ जानेवारी रोजी रेश्मा शेख शाहरुख हिने गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरुन सासरकडील ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी : विवाहितेचा छळ: आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:50 IST