शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बालकास मारहाण; पित्याविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:23 IST

तुझी आजी माझ्या जेवणात काही तरी औषध टाकत आहे, असे म्हणत आपल्याच पाच वर्षीय चिमुकल्यास निर्दयी बेदम मारहाण करणाऱ्या पित्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तुझी आजी माझ्या जेवणात काही तरी औषध टाकत आहे, असे म्हणत आपल्याच पाच वर्षीय चिमुकल्यास निर्दयी बेदम मारहाण करणाऱ्या पित्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गंगाखेड शहरातील मन्नाथनगर भागात मुलगा विलास बालाजी मनदुबले (३५) व दोन लहान नातवांसोबत लक्ष्मीबाई बालाजी मनदुबले (५५) या राहतात. ९ मे रोजी लक्ष्मीबाई या कामानिमित्त बाहेर गेल्या असता त्यांचा मुलगा विलास मनदुबले याने त्याचा पाच वर्षीय मुलगा यश याला ‘तुझी आजी माझ्या जेवणात काही तरी औषध टाकत आहे’ असे म्हणून कमरेच्या चामडी पट्ट्याने पोटावर, पाठीवर, गालावर व डोक्यात अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली. त्यामुळे यशचे संपूर्ण अंग रक्ताळले व त्याच्या व्रण उमटून त्याला गंभीर दुखापत झाली. याचवेळी शेजारी राहणाºया हनुमान नामक व्यक्तीने यशला एवढी मारहाण का केली, असे विलास मनदुबले याला विचारले असता त्यालाही त्याने शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.आजी लक्ष्मीबाई मनदुबले या घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी यशला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन आरोपी पिता विलास मनदुबले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, या पूर्वीही चार दिवसांपूर्वी विलासने त्याच्या दुसºया मुलास अशीच मारहाण केली होती. त्यामुळे या निर्दयी पित्याविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला. या घटनेचा नागरिकांनी निषेधही केला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी