शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाण्यासाठी मनपावर धडकला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:57 IST

शहरातील खानापूर नगर भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. ढोल-ताशाच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करीत निघालेल्या या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील खानापूर नगर भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. ढोल-ताशाच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करीत निघालेल्या या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधले.खानापूर नगर हा शहरापासून दूर अंतरावर असलेला भाग असून या भागात मागील काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महापालिकेने या परिसरासाठी जलवाहिनी टाकली असली तरी अद्याप या जलवाहिनीला मुख्य जलवाहिनीशी जोडले नसल्याने नळांना पाणी येत नाही. हातपंपांची पाणीपातळी खालावल्यामुळे टंचाईत भर पडली आहे. दररोज पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी २८ जानेवारी रोजी सकाळी खानापूरनगर येथून मोर्चाला सुरुवात केली. ढोल-ताशाच्या गजरात निघालेला हा मोर्चा वसमत रस्त्यावरुन महापालिकेवर पोहचला. या ठिकाणी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, यासह इतर घोषणांनी परिसर दणाणून गेला. या मोर्चात परिसरातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.खानापूरवासियांचा प्रश्न४खानापूर नगर भागात जलवाहिनी नसल्याने येथील नागरिकांना हातपंपाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. जलवाहिनीचे काम अर्धवट असून हातपंपही आटल्याने पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी थेट मनपा कार्यालयावर मोर्चा काढला.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीagitationआंदोलन