शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:59 IST

शहरातून जाणाऱ्या गंगाखेड ते लोहा या मार्गावर गंगाखेड आगाराकडून मागील अनेक दिवसांपासून खिळखिळ्या झालेल्या बसचा वापर केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. बसमुळे वाहक व प्रवाशांचे अनेकदा खटके उडाल्याचेही प्रकार समोर आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): शहरातून जाणाऱ्या गंगाखेड ते लोहा या मार्गावर गंगाखेड आगाराकडून मागील अनेक दिवसांपासून खिळखिळ्या झालेल्या बसचा वापर केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. बसमुळे वाहक व प्रवाशांचे अनेकदा खटके उडाल्याचेही प्रकार समोर आले आहेत.गंगाखेड ते लोहा या मार्गावर नेहमीच प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. तसेच पालम शहरातून हा रस्ता जात असल्याने प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत प्रवासी एसटी महामंडळाच्या बसकडे जातात. चांगली सेवा मिळेल ही आशा प्रवाशांना असते; परंतु गंगाखेड आगाराच्या गलथान कारभाराचा फटका या मार्गावर प्रवास करणाºया प्रवाशांना नेहमीच बसत आहे.मागील महिनाभरापासून बस क्रमांक एम.एच. २२ यु- ९९३३ ही या मार्गावर गंगाखेड ते लोहा शटल सेवा म्हणून फेºया मारत आहे. या बसवरील पत्रे जागोजागी तूटून गेल्याने प्रवाशांच्या अंगावर कधी पडेल याचा नेम राहिलेला नाही. तसेच खिडक्या तुटल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घेऊनच प्रवास करावा लागत आहे. बस चालू होताच मोठा आवाज येत असल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण होत आहे.या बसच्या अवस्थेला गंगाखेड आगार जबाबदार असूनही याकडे दुर्लक्षही केले जात आहे. प्रवास करणारे प्रवासी मात्र वाहकाशी वाद घालत असल्याने बसमध्ये गोधळ निर्माण होत आहे.१ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता ही बस गंगाखेडकडून निघाल्यानंतर प्रवाशांनी बसमध्ये मोठा गोंधळ घातला होता. वारंवार तक्रार करूनही नादुरुस्त बस या मार्गावर चालवली जात आहे.विभागीय नियंत्रकांनी याकडे लक्ष देवून दुरुस्त बसेस पालम तालुक्यासाठी सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.खिळखिळ्या बसेस्: प्रवाशांच्या तक्रारीकडे दूर्लक्षच४परभणी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर पालम तालुका वसलेला आहे. या तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर अपेक्षित विकास मात्र झालेला नाही. एस.टी. महामंडळाचे जिल्ह्यामध्ये चार आगार आहेत. यामध्ये परभणी, पाथरी, जिंतूर, गंगाखेड या आगाराचा समावेश आहे. गंगाखेड आगारातून पालम तालुक्यात बसेस सोडण्यात येतात व त्यावर नियंत्रण ठेवण्यात येते; परंतु पालम तालुक्यासाठी सोडण्यात येणाºया बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. याबाबत प्रवाशांनी अनेकवेळा एस.टी. महामंडळ प्रशासनाकडे तक्रारी केल्या; परंतु गंगाखेड आगार प्रमुखाचे दूर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारीला आगार प्रमुखांनी खो दिल्याची भावना निर्माण होत आहे.आगारप्रमुखांचे दूर्लक्ष४गंगाखेड आगारातून नादुरुस्त बसेस रस्त्यावरुन धावत आहेत. याबाबत अनेक वेळा प्रवाशांनी आगारप्रमुख व बसस्थानक प्रमुखांकडे तक्रारी केल्या; परंतु आगारप्रमुखांचे दूर्लक्ष झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी तात्काळ लक्ष देवून प्रवाशांना सुस्थितीत असलेल्या बसेस सोडण्यात याव्यात व प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportएसटी