शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाणीपुरवठा योजनाचाचणी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:36 IST

येलदरी येथून परभणी शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, आठवडाभरापासून येलदरी ते धर्मापुरी या अंतरात पाणी घेण्याची चाचणी केली जात आहे़ दोन दिवसांमध्ये चाचणीचे कामही पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येलदरी येथून परभणी शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, आठवडाभरापासून येलदरी ते धर्मापुरी या अंतरात पाणी घेण्याची चाचणी केली जात आहे़ दोन दिवसांमध्ये चाचणीचे कामही पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे़परभणी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत येलदरी प्रकल्पावरून परभणी शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती़ दहा वर्षापासून ही योजना रखडली असून, सध्या अमृत योजनेतून याच योजनेतील उर्वरित कामे केली जात आहेत़ या अंतर्गत शहरापासून साधारणत: ८ किमी अंतरावर असलेल्या धर्मापुरी परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारणीचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे़ तसेच येलदरी येथे उद्भव विहीर, येलदरी ते बीपीटी पर्यंतचे कामही पूर्ण झाले असून, येलदरीपासून परभणीपर्यंत जलवाहिनीही टाकण्यात आली आहे़ येलदरी जलाशयातून धर्मापुरी परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी घेण्याची चाचणी केली जात आहे़ धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहचल्यानंतर या योजनेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार असल्याने या चाचणीला महत्त्व आले आहे़सध्या ही चाचणी घेण्याचे काम सुरू आहे़ येलदरी जलाशयापासून ७ किमी अंतरावर असलेल्या जिंतूर परिसरात ब्रेक पॉर्इंट टर्मिनन बसविण्यात आले आहे़ १ कोटी २५ लाख लिटर क्षमता असलेल्या या बीपीटीपर्यंतची चाचणी पूर्ण झाली असून, पम्पींगच्या सहाय्याने येलदरीतील पाणी बीपीटीपर्यंत पोहचले आहे़ बीपीटीपासून ते धर्मापुरीपर्यंत पाणी घेण्याची चाचणी सध्या सुरू आहे़ मात्र या अंतरात टाकलेली जलवाहिनी अनेक ठिकाणी मातीने बंद पडली आहे़ त्यामुळे या जलवाहिनीतील ब्लॉकेज काढण्याचे काम मनपाच्या वतीने केले जात आहे़ जिंतूर शहर, बोरी, झरीमार्गे धर्मापुरीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे़ ५ ते ६ महिन्यांपूर्वी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले असून, प्रत्यक्ष चाचणी घेताना या जलवाहिनीत अनेक ठिकाणी माती अडकून पडल्याचे समोर आले़ त्यामुळे चाचणी घेण्यापूर्वी जलवाहिनीतील ब्लॉकेज मोकळे करावे लागणार असून, हे काम सध्या सुरू आहे़ विशेष म्हणजे बीपीटीपासून ते धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत केवळ गुरुत्वार्षणाच्या तत्त्वावरच पाणी येणार आहे़ यासाठी १०० मीटर ग्रॅगीएंट ठेवण्यात आला आहे़ ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर पुढील कामाला सुरूवात होईल़ येत्या एक-दोन दिवसांत प्रत्यक्ष धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी घेऊन चाचणी केली जाणार आहे़ ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर येलदरीचे पाणी जलवाहिनीच्या सहाय्याने परभणीपर्यंत पोहोचविण्याचा टप्पाही पूर्ण होईल़ त्यामुळे या चाचणीला महत्त्व आले असून, येत्या एक-दोन दिवसांत चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली़मीटर रुमच्या कामाला सुरुवातयेलदरी येथे उद्भव विहीर बांधण्यात आली असून, धरणातील पाणी उपसा करण्यासाठी स्वतंत्र मीटर रुमही अमृत योजनेंतर्गत तयार केली जात आहे़ मीटर रुम उभारणीसाठी कंत्राटदारास मार्कआऊट टाकून देण्यात आले आहेत़ यामुळे मीटर रुम उभारणीच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे़ मीटर रुम उभारणीनंतर पम्पींगच्या सहाय्याने पाणी उपसा करणे शक्य होणार आहे़ हे कामही येत्या काही दिवसांत पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली़जलशुद्धीकरणाचे ८० टक्के कामधर्मापुरी परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे़ या ठिकाणी एरीयशन काम पूर्ण झाले असून, या एरीयशनमध्ये गढूळ पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया होणार आहे़ तसेच दोन मोठे टँक उभारण्यात आले असून, या टँकमधून शुद्धीकरणाचे काम होणार आहे़ धर्मापुरीपासून ते परभणी शहरापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे कामही पूर्ण झाले आहे़ त्यामुळे येलदरी धरणातील पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचल्यानंतर परभणीकरांना पिण्यासाठी मिळण्याची प्रतीक्षाही संपणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी