शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाण्याचा बेसुमार उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 01:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गंगाखेड ( परभणी ) : तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात पिण्यासाठी आरक्षित ठेवलेल्या पाण्याचा मोटारीच्या सहाय्याने रात्रंदिवस ...

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी ) : तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात पिण्यासाठी आरक्षित ठेवलेल्या पाण्याचा मोटारीच्या सहाय्याने रात्रंदिवस बेसुमार उपसा होत असल्याने गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.गोदावरी नदीपात्रातून होणारा पाण्याचा उपसा बंद न केल्यास गोदाकाठच्या ग्रामीण भागासह गंगाखेड शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.तालुक्यातील मुळी येथे बांधण्यात आलेल्या बंधाºयाचे दरवाजे निखळून पडलेले असल्याने गेल्या काही वर्षापासून बंधाºयात पावसाच्या पाण्याची साठवण होत नाही. बंधाºयाला असलेल्या सिमेंट ओट्यामुळे मुळी, दुस्सलगाव ते खळी, महातपुरी, आनंदवाडी शिवारात नदीपात्रात काही प्रमाणात पाणी साचलेले राहत आहे. नदीपात्रातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाने येथे असलेल्या कृषीपंपाच्या मोटारी काढून घेण्याच्या सूचना संबंंधित शेतकºयांना दिल्या; परंतु, याकडे दुर्लक्ष करीत खळी गावच्या वरच्या भागात असलेल्या आसरामाय डोहातून ब्रह्मनाथवाडी, धारासूर शिवारापर्यंत अंदाजे तीन ते चार कि.मी. पर्यंत पाईपलाईन करून कृषीपंपाच्या सहाय्याने नदीपात्रातील पाणी शेतात नेले जात आहे. खळी गावातील मारोती मंदिराजवळील खळी डोहातून महातपुरी शिवारातील शेतात कृषीपंपाने व खळी पुलाजवळ असलेल्या कनकेश्वरी मठाजवळील सीतामाय डोहातून महातपुरी, आनंदवाडी, दत्तवाडी तसेच भांबरवाडी शिवारातील पाच ते सात कि.मी. अंतरापर्यंत पाईपलाईन टाकून विद्युत मोटारीच्या सहाय्याने नदीपात्रातून शेतापर्यंत पोहचविण्यासाठी रात्रंदिवस बेसुमार उपसा केला जात आहे.गोदावदी नदीपात्रातील मुळी बंधाºयाच्या सिमेंट ओट्यामुळे बंधारा भागात मुळी, दुस्सलगाव, खळी, महातपुरी, आनंदवाडी आदी शिवारात साचलेल्या पाण्याचा कृषीपंपाच्या सहाय्याने शेतीच्या वापरासाठी रात्रंदिवस उपसा होत असल्याने पाण्याची पातळी झपाट्याने खालावून नदीचे पात्र कोरडे पडत आहे. पिण्यासाठी आरक्षित केलेल्या पाण्याचा उपसा वेळीच थांबविला नाही तर भविष्यात गोदाकाठी असलेल्या ग्रामीण भागातील गावांबरोबरच गंगाखेड शहरवासिय तसेच जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण होईल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पिण्यासाठी आरक्षित असलेल्या गोदावरी नदीपात्रातील पाण्याचा उपसा तत्काळ थांबवावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.४गंजायकवाडी विभागाने शेतकºयांना दिली नोटीसभीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी गंगाखेड तालुक्यातील खडका बंधारा, मुळी बंधारा व गोदावरी नदीपात्रातील पाणीसाठा सभोवतालच्या गावाकरीता हा पिण्यासाठी राखीव ठेवला आहे. त्यामुळे या ठिकाणावरुन पाणी उपसा करता येणार नाही. तेव्हा ३० जून २०१९ पर्यंत आपण खडका, मुळी बंधारा व गोदावरी नदीपात्रातून विद्युत मोटारीने पाणी उपसा बंद करावा, अन्यथा विद्युत मोटारी व इतर साहित्य जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येतील, अशा नोटिसा जायकवाडी पाटबंधारे सिंचन शाखा क्रमांक ८ चे शाखाधिकारी यांनी १५ डिसेंबर २०१८ रोजीच संबंधित शेतकºयांना बजावल्या आहेत. गाखेड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना गोदावरी नदीपात्रातून बसुमार पाण्याचा उपसा सुरू आहे; परंतु, याकडे तालुका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.४त्यामुळे बिनदिक्कतपणे शेतीसाठी पाण्याचा उपसा सुरू आहे. जायकवाडी विभागाने नोटिसा देऊनही पाणी उपसा थांबत नसेल तर भविष्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीriverनदी