शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ३६ लाखांचा अपहार; चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 00:41 IST

श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट को-आॅप क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या ३६ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणात चेअरमनसह इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट को-आॅप क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या ३६ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणात चेअरमनसह इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.तालुक्यातील पिंपरी देशमुख येथील चंद्रकांत बाबासाहेब देशमुख यांनी ८ आॅगस्ट २०१८ रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानुसार श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट को-आॅप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन व पदाधिकाऱ्यांनी ३६ लाख रुपयांचा अपहार करून सोसायटी बंद केली. सोसायटीचे चेअरमन सतीश पोपटराव काळे, तत्कालीन क्षेत्रीय अधिकारी अशोक शाहूराव राठोड, शाखाधिकारी सुनील मधुकरराव मुळे आणि रोखपाल संतोष विश्वनाथ आडे या चौघांविरुद्ध नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. दीड वर्षांपासून आरोपी फरार होते. या गुन्ह्याचा तपास करणाºया आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने १४ जानेवारी रोजी अशोक राठोड यास पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथून ताब्यात घेतले. १५ जानेवारी रोजी रोखपाल संतोष आडे याला बीड जिल्ह्यातील तिगाव तांडा (ता.वडवणी) येथून ताब्यात घेतले. तसेच आरोपी सुनील मधुकरराव मुळे यास २६ जानेवारी रोजी माजलगाव येथून ताब्यात घेतले. या सोसायटीचे चेअरमन सतीश पोपटराव काळे हा इतर गुन्ह्यात नाशिक कारागृहात होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सध्या सतीश काळे, अशोक राठोड आणि संतोष आडे हे न्यायालयीन कोठडीमध्ये असून, सुनील मुळे हा ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहे, असे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सखोल माहिती घेतली जात आहे. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक रागसुधा, सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद दळवी, बाबासाहेब लोखंडे, बाबुराव कराळे, संजय वळसे, पंडित खरडे, अमोल वाडेकर, देवानंद भालेराव, सायबर सेलचे बालाजी रेड्डी व राजेश आगाशे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी