शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘जायकवाडी’ भरल्याने वाढल्या आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:49 IST

जायकवाडी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने या प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात २ हजार क्युसेस पाणी सोडले जात आहे. या पाण्याच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील चारही बंधारे १०० टक्के भरुन घेण्याची मागणी होत आहे. तेव्हा पाटबंधारे विभाग या संदर्भात काय निर्णय घेते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जायकवाडी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने या प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात २ हजार क्युसेस पाणी सोडले जात आहे. या पाण्याच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील चारही बंधारे १०० टक्के भरुन घेण्याची मागणी होत आहे. तेव्हा पाटबंधारे विभाग या संदर्भात काय निर्णय घेते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पामध्ये पाण्याची आवक सुरु झाली असून हा प्रकल्प ९८ टक्के भरला आहे. त्यामुळे प्रकल्पातून डाव्या आणि उजव्या कालव्याबरोबरच गोदावरी नदीपात्रातही पाणी सोडले जात आहे. सोमवारी सकाळी जायकवाडी प्रकल्पातून २ हजार क्युसेस पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले. पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु झाला असून साधारणत: दोन दिवसांमध्ये हे पाणी परभणी जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गोदावरी नदीवर मुद्गल, तारुगव्हाण, ढालेगाव, मुळी आणि डिग्रस हे पाच बंधारे बांधले आहेत. त्यापैकी तारुगव्हाण बंधाऱ्याचे काम अजून शिल्लक असल्याने या बंधाºयात पाणीसाठा होत नाही. मात्र पाथरी तालुक्यातील मुद्गल आणि ढालेगाव या दोन बंधाºयात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करणे शक्य आहे. तसेच पालम तालुक्यातील डिग्रस उच्च पातळीतील बंधाºयातही पाणीसाठा करणे शक्य आहे. दीड महिन्यापूर्वी नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे जायकवाडी प्रकल्पातील उर्ध्वभागातील प्रकल्प १०० टक्के भरल्याने जायकवाडीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यावेळी जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील बंधारे पूर्ण क्षमतेने भरणे अपेक्षित असताना केवळ पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणा एवढेच पाणी बंधाºयामध्ये साठविण्यात आले. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी सिंचनाचा प्रश्न कायम आहे.१५ सप्टेंबर रोजी जायकवाडी प्रकल्प पुन्हा एकदा ९८ टक्के भरला असून या प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे आता या पाण्याचे राजकारण न करता जिल्ह्यातील चारही बंधारे पाण्याने भरुन घेण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाण्याची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत गोदावरी नदीवर बांधलेले बंधारे जिल्ह्यासाठी वरदान ठरु शकतात. बंधाऱ्यांमध्ये पूर्णक्षमतेने पाणीसाठा झाला तर बंधारा परिसरातील शेकडो गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच सिंचनाचा प्रश्न निकाली निघू शकतो. त्यामुळे जिल्ह्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्व बंधारे पाण्याने १०० टक्के भरुन घ्यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.बंधाºयांमध्ये : २५ टक्केच पाणीसाठा४पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाºयावर पाथरी शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण नोंदविले आहे. १६ दलघमी क्षमतेचा हा बंधारा असून सद्यस्थितीला बंधाºयात केवळ ३.१५ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे.४याच तालुक्यातील मुद्गल बंधाºयातून सोनपेठ शहराला पाणी दिले जाते. त्यासाठी २.८५ दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. १४ दलघमी क्षमतेचा हा बंधारा असून सध्या बंधाºयात ३.२५ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे.४तर पालम तालुक्यातील डिग्रस हा जिल्ह्यात सर्वात मोठा ६४ दलघमी क्षमतेचा बंधारा आहे. मात्र या बंधाºयात केवळ १२ दलघमी पाणीसाठा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मागील वेळेस बंधारे पाण्याने पूर्ण क्षमतेने भरुन घेणे आवश्यक होते.४ त्यावेळी केवळ पिण्यापुरताच पाणीसाठा करण्यात आला. आता यावेळी दुसºयांदा नदीपात्रात पाणी सोडले जात असल्याने हे बंधारे १०० टक्के भरुन घेतले तर पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीRainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प