शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

परभणी : इंटरनेटचा न्यायालयीन कामकाजासही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:21 IST

दूरसंचार क्षेत्रात खाजगी कंपन्यांकडून एकीकडे दबदबा निर्माण केला जात असताना दुसरीकडे भारत संचार निगम या कंपनीचा कारभार सुधारत नसल्याची स्थिती आहे. बीएसएनएलच्या या ढिसाळ कारभाराचा न्यायालयीन कामकाजावरही परिणाम झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: दूरसंचार क्षेत्रात खाजगी कंपन्यांकडून एकीकडे दबदबा निर्माण केला जात असताना दुसरीकडे भारत संचार निगम या कंपनीचा कारभार सुधारत नसल्याची स्थिती आहे. बीएसएनएलच्या या ढिसाळ कारभाराचा न्यायालयीन कामकाजावरही परिणाम झाला आहे.परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांचे भारत संचार निगम लिमिटेडचे प्रमुख कार्यालय परभणी येथे आहे. जिल्हाभरातील बहुतांश शासकीय कार्यालयांकडे बीएसएनएलची ब्रॉडबँड इंटरनेट सेवा आहे.सर्व शासकीय कार्यालयांचा कारभार आता आॅनलाईन झाला आहे. त्यामुळे या कार्यालयांना इंटरनेट कनेक्टीव्हीटी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे बीएसएनएलने इंटरनेट सेवेमध्ये सुधारणा घडवून आणणे आवश्यक होते; परंतु, या शासकीय कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मूळ सेवेकडे दुर्लक्ष झाले असल्याने इंटरनेट सेवेचा दोन्ही जिल्ह्यात बोजवारा उडाला असल्याचे दिसून येत आहे. परभणी येथील जिल्हा न्यायालयाच्या अधिनस्त परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, हिंगोली, औंढा नागनाथ, वसमत, पूर्णा, गंगाखेड, पालम, सोनपेठ, पाथरी, सेलू, जिंतूर, मानवत या १३ तालुक्यांचे कामकाज चालते. इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे न्यायालयीन व्यवस्थाही आॅनलाईन झाली आहे. त्यामुळे यासाठी इंटरनेटची अत्यंत आवश्यकता आहे. या सर्व तालुका न्यायालयाच्या ठिकाणी व्हीपीएन ब्रॉडबॅन्ड कनेक्शनची टाकण्यात आलेली लीज लाईन गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने बंद पडत आहे. परिणामी न्यायालयीन कामकाज करीत असताना न्यायालयातील दैनंदिन प्रकरणातील अहवाल, न्यायालयात झालेले निर्णय, दररोजचा सीआयजी डेटा हे नॅशनल ज्युडिशियल डाटा ग्रीड या वेबसाईटवर अपलोड होत नाही. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाबरोबरच पक्षकार आणि वकिलांना अडचणी निर्माण होत आहेत.न्यायालयातील संपूर्ण संगणकीकरणामुळे ब्रॉडबॅन्ड, व्हीपीएन आणि लीजलाईन हे व्यवस्थित चालणे आवश्यक आहे. असे असताना बीएसएनएलच्या अधिकाºयांकडून याबाबत फारसी काळजी घेतली जात नाही. परिणामी न्यायालयीन कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. याकडे बीएसएनएलच्या विभागीय स्तरावरील अधिकाºयांनीच कटाक्षाने लक्ष देऊन निर्णय घेणे आवश्यक आहे.ओएफसी केबल बदलूनही फरक पडेनाबीएसएनएलच्या वतीने शहरातील जुने वायर काढून ब्रॉडबॅन्ड इंटरनेट सेवेच्या ओएफसी केबल बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे इंटरनेट स्पीडने मिळणे आवश्यक आहे; परंतु, परिस्थितीमध्ये मात्र फारसा बदल झालेला दिसत नाही. आतापर्यंत बीएसएनएलची सेवा वापरणाºया खाजगी व्यावसायिकांच्या बीएसएनएलबाबत तक्रारी होत्या. आता न्यायालयाच्या कामकाजावरही त्याचा परिणाम दिसून येत असल्याने बीएसएनएलच्या कारभाराबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.बीएसएनएलच्या वतीने फायबर आॅप्टीकलची नियमितपणे देखभाल केली जात नसल्याने इतर शासकीय कार्यालयांनाही म्हणावे त्या वेगाने इंटरनेटची सुविधा मिळत नाही. यामध्ये समाजकल्याण, भूमिअभिलेख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आदींचा समावेश आहे. याचा कार्यालयांच्या नियमित कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीInternetइंटरनेटCourtन्यायालयBSNLबीएसएनएल