शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

परभणीत दुपटीने वाढविला दारूचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:54 IST

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दारु, मांसाहार करीत जल्लोष करण्याची प्रथा मागील काही वर्षांपासून रुढ झाली असून या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील व्यावसायिकांनीही तयारी सुरु केली आहे. मांसाहारासह दारूचा दुप्पट साठा करुन ठेवण्यात आला असून नववर्षाच्या स्वागतासाठी व्यावसायिक सज्ज झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दारु, मांसाहार करीत जल्लोष करण्याची प्रथा मागील काही वर्षांपासून रुढ झाली असून या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील व्यावसायिकांनीही तयारी सुरु केली आहे. मांसाहारासह दारूचा दुप्पट साठा करुन ठेवण्यात आला असून नववर्षाच्या स्वागतासाठी व्यावसायिक सज्ज झाले आहेत.जिल्ह्यातील नववर्षाच्या स्वागताचे वेध ३० डिसेंबरपासून लागले आहेत. ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देत देत नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या स्वागतासाठी जिल्ह्यातील विविध हॉटेल्स, ढाबे आणि इतर ठिकाणी एकत्र येऊन सिलेब्रिशन केले जाते. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स आणि ढाब्यांवर फुल्ल गर्दी होते. दरवर्षी ३१ डिसेंबरच्या दिवशी होणारी ही गर्दी लक्षात घेऊन व्यावसायिकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. या तयारीचा आढावा घेतला असता दररोज विक्री होणाऱ्या दारु आणि मांसाहाराच्या तुलनेने दुप्पट स्टॉक करण्यात आला आहे.परभणी शहर व परिसरात ७ वाईन शॉप, १७ परमीट रुम, २४ बिअरबार आणि देशी दारुचे ९ परवानाधारक आहेत. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर या सर्वांनीच दारुचा दुप्पट साठा करुन ठेवला आहे. दररोज विक्री होणाºया दारुपेक्षाही अधिक दारु विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवली आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सुमारे १७०० पेटी दारु जास्तीची मागविण्यात आली आहे.एका पेटीमध्ये १८० एमएलच्या ४८ बाटल्या असतात. सर्वसाधारणपणे देशी दारुच्या ४०० पेटी, विदेशी दारुच्या ६०० पेटी आणि ७०० पेटी बीअर जास्तीची मागविण्यात आली आहे. विशेष म्हणजे ३१ डिसेंबर रोजी वाईनशॉप रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून परमीट रुमला पहाटे ५ वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आली आहे.नववर्षाचे स्वागत करीत असताना हॉटेल्समधून शाकाहाराबरोबरच मोठ्या प्रमाणात मांसाहारही केला जातो. ही बाब लक्षात घेऊन व्यावसायिकांनी चिकन, मटणचाही स्टॉक वाढविला आहे. सर्वसाधारणपणे शहर परिसरात विक्री होणाºया मांसाहाराच्या तुलनेत ८ ते १० पट वाढीव स्टॉक केल्याची माहिती येथील व्यावसायिकांनी दिली. बारामती, नगर, पुणे, हैदराबाद आदी ठिकाणाहून हा स्टॉक मागविला असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.एकंदर नववर्षाच्या स्वागतासाठी रविवारपासूनच जिल्ह्यात तयारी सुरू करण्यात आली आहे. शहरातही अनेक ठिकाणी नववर्षाच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. दोन दिवसांपासूनच नववर्षाच्या स्वागताची लगबग सुरू झाली असून, युवकांचा उत्साह लक्षात घेऊन व्यावसायिकांनी आधीपासूनच तयारी करुन ठेवली आहे.पोलिसांचाही राहणार तगडा बंदोबस्तथर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यप्राशन करुन धोकादायकरित्या वाहने चालविली जातात. तसेच हॉटेल्स, ढाबे, लॉजवर अप्रिय घटना होण्याची शक्यता असते. या काळात पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष काळजी घेतली जाणार आहे. स्थानिक गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक, वाहतूक शाखा, जिल्हा विशेष शाखेचा बंदोबस्त ठिकठिकाणी लावण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा शाखा व जिल्हा विशेष शाखेच्या साध्या वेषातील कर्मचाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने कळविले आहे. बंदोबस्तासाठी ६ स्ट्रायकिंग फोर्स, पोलीस नियंत्रण कक्षातील राखीव बंदोबस्त, दोन जलद प्रतिसाद पथक, तीन आरसीपी प्लाटून तैनात ठेवण्यात आल्या आहेत. बॉम्बशोधक नाशक पथक, दहशतवाद विरोधी पथकाच्या वतीनेही जिल्ह्यात तपासणी केली जाणार आहे. रात्रीच्या गस्तीवरील अधिकारी- कर्मचाºयांना पोलीस अधीक्षकांनी विशेष सूचनाही दिल्या आहेत.केकची विक्रीही वाढणार४नववर्षाचे स्वागत करीत असताना केक कापून जल्लोष केला जातो. त्यामुळे या दिवशी केकलाही चांगलीच मागणी वाढते. फ्रेश क्रीम आणि बटर क्रीम असे दोन प्रकारचे केक ग्राहकांच्या पसंतीस उतरतात. बेकरी विक्रेत्यांनी ग्राहकांची ही वाढती मागणी लक्षात घेऊन केकचा स्टॉकही दुप्पटीने वाढविला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीNew Year 2019नववर्ष 2019