शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आवक वाढल्याने पालेभाज्यांचे भाव कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:19 IST

जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाल्याने पालेभाज्यांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. परिणामी त्यांचे भाव कोसळले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाल्याने पालेभाज्यांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. परिणामी त्यांचे भाव कोसळले आहेत.परभणी जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे जलसाठे तुडुंब भरले होते. त्यामुळे अनेक वर्षापासून येलदरी व जायकवाडी सारखी मोठी धरणे शंभर टक्के भरली. त्यामुळे पाणीपातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जिल्ह्यातील ८६ जलसाठ्यांचे निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये ३.६५ मीटरने पाणीपातळी वाढल्याची भूजल सर्व्हेक्षण विभागाकडे नोंद आहे. पाणीपातळी वाढल्याने विहीर व बोअरला पाणीही मुबलक उपलब्ध आहे.त्यामुुळे या पाण्यावर भाजीपाल्याची पिके घेण्याचे प्रमाणही जिल्ह्यात वाढले आहे. काही दिवसांमध्येच ही पिके हातात येत असल्याने व त्यांना यापूर्वी चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना यावर्षीही भाजीपाल्याला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, त्यांचीही अपेक्षा फोल ठरताना दिसून येत आहे. परभणी येथील शनिवारच्या बाजारात या पालेभाज्यांच्या दरांचा आढावा घेतला असता शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटाची जाणीव होऊ लागली आहे.काही दिवसांपूर्वीच शंभर रुपयांपेक्षा अधिक प्रतिकिलो रूपये दराने विकला जाणारा कांदा शनिवार बाजारात २० रुपये प्रतिकिलोने विकला जात होता. बटाटेही २० रुपये किलोनेच तर टोमॅटो ७ रुपये प्रतिकिलोने, कोथिंबीर फक्त १५ रुपये प्रतिकिलोने विकली जात होती. आद्रक ५० रुपये प्रतिकिलो तर वांगे २० रुपये , भेंडी ३० रुपये, फूलकोबी व पत्ताकोबी प्रतिकिलो १५ रुपये, शिमला मिरची ३० रुपये, काकडी १२ रुपये, लिंबू ३० रुपये, गाजर १५ रुपये, वालाच्या शेंगा २० रुपये, मेथी ५ रुपये प्रति जुडी, पालक १५ रुपये जुडी, कांदापात २० रुपये जुडी, शेपू १५ रुपये प्रति जुडी दराने विकली जात होती. मुळा १० रुपयास एक, शेवगा, गवार प्रतिकिलो ६० रुपये तर चवळीची शेंग ४० रुपये प्रतिकिलोे, कारले ४० रुपये प्रतिकिलो, कद्दू प्रति नग १० रुपये या दराने विक्री केला जात असल्याचे पहावयास मिळाले. एकीकडे पालेभाज्यांचे भाव कोसळले असताना खरेदीदारांची फारशी गर्दी दिसून येत नव्हती. त्यामुळे ग्रामीण भागातून थेट बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेतकºयांच्या चेहºयावर निराशेची भावना दिसून येत होती.यावर्षी पहिल्यांदाच चांगले पाणी उपलब्ध झाल्याने मोठ्या अपेक्षेने शेतात पालेभाज्यांची लागवड केली होती. यासाठी मेहनतही अधिक घेतली होती. आता बाजारात माल विक्रीला आणल्यानंतर भाव मिळत नाही. त्यामुळे या मालाच्या विक्रीतून मिळणाºया पैशावर संसाराचे केलेले नियोजन फिसकटले आहे. त्यामुळे आमच्यावर नेहमीप्रमाणे संकटाची छाया गडद झाली आहे.-संतोष इक्कर,भाजीपाला विक्रेता

टॅग्स :parabhaniपरभणीvegetableभाज्याRainपाऊस