शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ग्रामीण युवकांशी समन्वय वाढवा - पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:31 IST

ग्रामीण भागात पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी सुसंवाद वाढवावा, अशा सूचना करीत असतानाच नवयुवकांनाही विश्वासात घेऊन त्यांना आंदोलनातून होणाºया नुकसानीची माहिती द्यावी, अशा सूचना नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निशिथ मिश्रा यांनी पोलीस अधिकाºयांना दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ग्रामीण भागात पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी सुसंवाद वाढवावा, अशा सूचना करीत असतानाच नवयुवकांनाही विश्वासात घेऊन त्यांना आंदोलनातून होणाºया नुकसानीची माहिती द्यावी, अशा सूचना नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निशिथ मिश्रा यांनी पोलीस अधिकाºयांना दिल्या.गुरुवारी मराठा समाजाच्या आंदोलनावर लाठीमार केल्याच्या निषेधार्थ शनिवारी परभणी जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक तसेच पोलिसांना मारहाण करण्याची घटना घडली. या आंदोलनात अधिकतर नवयुवकांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलीस महानिरीक्षक निशिथ मिश्रा यांनी परभणीत भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाºयांशी संवाद साधून मागील दोन-तीन दिवसांत घडलेल्या घटनांचा आढावा घेतला. पोलीस अधिकारी, कर्मचाºयांवरच आंदोलकांनी दगडफेक, मारहाण केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माहितीही घेतली. या आंदोलनामध्ये नवयुवक आक्रमक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावर पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांनी ग्रामीण भागात संपर्क वाढवावा, साध्या वेषात जावून थेट या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते, हे पटवून द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.जखमी पोलीस कर्मचाºयांची केली विचारपूसशनिवारी आंदोलनादरम्यान टाकळी कुंभकर्ण येथे झालेल्या दगडफेक व मारहाणीच्या घटनेत पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडाळकर, फौजदार उदय सावंत, योगेश सानप, जनार्दन चाटे, सुरेश सुरनर, जे़जे़ कदम, राजकुमार बचाटे, ज्ञानेश्वर लिंबाळकर, साईनाथ मिठेवाड हे कर्मचारी जखमी झाले होते. या सर्व जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, रविवारी पोलीस महानिरीक्षक निशीथ मिश्रा यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन सर्व जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.यावेळी त्यांनी नेमकी घटना कशी घडली, याचीही माहिती जाणून घेतली. याप्रसंगी पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, नानलपेठचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे आदींची उपस्थिती होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत अधिकाºयांना सूचनाही केल्या.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसNandedनांदेड