शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील घटना: फरशीचे वार करून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 01:13 IST

शहरातील महावीर चित्र मंदिर परिसरात फरशीचे वार करुन एका युवकाचा खून केल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास समोर आली. या प्रकरणात नानलपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करुन घटनेतील आरोपी निष्पन्न करीत अवघ्या सहा तासांत त्याला जेरबंद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील महावीर चित्र मंदिर परिसरात फरशीचे वार करुन एका युवकाचा खून केल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास समोर आली. या प्रकरणात नानलपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करुन घटनेतील आरोपी निष्पन्न करीत अवघ्या सहा तासांत त्याला जेरबंद केले.शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात महावीर चित्र मंदिर जवळ एका युवकाच्या डोक्यात फरशीचे घाव घालून खून केल्याची घटना रविवारी सकाळी निदर्शनास आली. घटनेची माहिती नानलपेठ पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेसी हेही घटनास्थळी दाखल झाले. फरशीचे घाव घातल्याने मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव शेख मोबीन शेख अखिल (२२, रा.मदिना पाटी) असे असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी अब्दुल रहीम यांच्या फिर्यादीवरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मयत शेख मोबीन शेख अखिल यास त्याच्या घरासमोर राहणाºया सय्यद फरहान सय्यद मुसा याने रविवारी सकाळीच बोलावून घेतले होते. तेव्हापासून सय्यद फरहान हा गायब असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.त्यामुळे पोलिसांनी सय्यद फरहान याचा शोध सुरु केला. पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे सय्यद उमर, नितीन कसबे यांनी बोरी शिवारात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. घटनेनंतर ६ तासांमध्येच मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे हे करीत आहेत. दरम्यान, हा खून नेमक्या कोणत्या कारणाने झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीMurderखून