शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

परभणी : २०० ठिकाणी अवैध धंदे तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:27 AM

शहरासह तालुक्यात २०० पेक्षा जास्त ठिकाणी अवैध देशी व हातभट्टी दारू सहज उपलब्ध होत आहे. तर ठिकठिकाणी कल्याण-मुंबई नावाचा जुगार, क्लब व अवैध लॉटरी सेंटर खुलेआम सुरू आहेत. या धंद्यांना नेमके कोणाचे पाठबळ मिळत आहे? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : शहरासह तालुक्यात २०० पेक्षा जास्त ठिकाणी अवैध देशी व हातभट्टी दारू सहज उपलब्ध होत आहे. तर ठिकठिकाणी कल्याण-मुंबई नावाचा जुगार, क्लब व अवैध लॉटरी सेंटर खुलेआम सुरू आहेत. या धंद्यांना नेमके कोणाचे पाठबळ मिळत आहे? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.शहरात मागील सहा महिन्यांपासून वरवर मुंबई, कल्याण, मीलन नाईट नावाचा जुगार बंद असल्याचे दिसत असले तरी अनेक ठिकाणी हा जुगार राजरोसपणे सुरू आहे. ग्राहकांना चिठ्ठी न देता डायरी व मोबाईलवर हा जुगार चालू आहे. विशेषत: शहरातील बसस्थानक, मोंढा, तहसील परिसर या ठिकाणी जुगाराचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे पोलीस प्रशासन अवैध धंदे बंद करण्याचा कांगावा करीत असले तरी या बंदमधील चालू धंद्यांना पाठबळ कोणाचे? हे न समजणारे कोडे आहे.या शिवाय शहरात चार ते पाच ठिकाणी क्लब आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या बड्याहस्तींचे हे क्लब असल्याने कार्यवाही होत नाही. तसेच अनाधिकृत लॉटरी सेंटरही खुलेआम सुरू आहेत. शहरासह ग्रामीण भागात देशीदारू सहज किराणा दुकान, पानटपरी व इतर ठिकाणी उपलब्ध होते. दररोज ंिजंतूर, इटोली, चारठाणा, बोरी आदी भागातील शेकडो बॉक्स दारू वाहतूक केल्या जाते. प्रत्येक गावात दोन ते तीन ठिकाणी दारू मिळते. या ठिकाणाहून पोलीस प्रशासनाला मोठा महसूल मिळत असल्याची चर्चा आहे. तसेच तालुक्यातील वाडी, तांड्यावर हातभट्टीचे प्रस्त वाढले आहे. हजारो लिटर हातभट्टी दारू तयार करून विक्री होत आहे. याकडेही कानाडोळा केला जात आहे. एकंदरित शहरातील वाढते अवैध धंदे, ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री, हातभट्टीचे वाढते प्रस्थ यामुळे पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.सतरंजी टाकून चालतो जुगार४शहरातील काही प्रतिष्ठीत व्यक्तीकडून शहराबाहेरील एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळी सतरंजी टाकून जुगार खेळला जातो. एवढेच नव्हे तर यासाठीची सर्व व्यवस्था एका व्यक्तीने केली आहे. यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. विशेष म्हणजे हा एक छोटा क्लब बनल्याची चर्चा सुरू आहे.पोलीस प्रशासन गप्प का?४शहरात व तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत कठोर कारवाई करण्याऐवजी पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. कारवाई न करण्यामागे पोलिसांचा हेतू काय आहे, असा प्रश्न नागरिकातून चर्चिला जात आहे. विशेष म्हणजे शहरातील दोन कि.मी. अंतरावर मैनापुरी या धार्मिक व पवित्र मंदिरात तसेच बंद पडलेल्या एका कारखान्याशेजारी शहरातील काही युवक मद्यपान व जुगार खेळत आहेत.शहरात व परिसरात मटका व अवैध धंदे बंद केले आहेत. कुठे चालू असतील तर लगेच कार्यवाही करू. नागरिकांनी जागरूक राहुून पोलिसांना माहिती दिली पाहिजे.-सोनाजी आम्ले, पोलीस निरीक्षक, जिंतूर

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस