शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : खुर्लेवाडी शिवारातून वाळूचा अवैध उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:06 IST

तालुक्यातील खुर्लेवाडी शिवारामधून गोदावरी नदीच्या पात्रातील वाळूचा अवैध उपसा रात्रभर केला जात आहे. महसूल प्रशासनाने उपाय योजना करूनही वाळूचोरी थांबलेली नाही. त्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील खुर्लेवाडी शिवारामधून गोदावरी नदीच्या पात्रातील वाळूचा अवैध उपसा रात्रभर केला जात आहे. महसूल प्रशासनाने उपाय योजना करूनही वाळूचोरी थांबलेली नाही. त्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे.पालम तालुक्यात गोदावरी नदीचे पात्र जागोजागी कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून वाळू चोरांनी धुमाकूळ घातला आहे. जिल्हाधिकारी पी.शिवशंकर हे निवडणुकीच्या कामातून मोकळे होताच कारवाईचा धडाका सुरू केला. त्यामुळे काही काळ वाळू माफिया शांत झाले होते. गोदावरी नदीच्या पात्रातून येणारे रस्ते महसूल विभागाच्या वतीने जेसीबीने खोदून जागोजागी खड्डे करण्यात आले होते. त्यामुळे वाळू चोरणारी वाहने पात्रात उतरणे कठीण होताना पहावयास मिळाले. खुर्लेवाडी शिवारामध्ये मात्र महसूल विभागाने खोदलेले खड्डे भरून टाकले आहेत. या रस्त्याचा सर्रासपणे अवैध उपसा करण्यासाठी वापर केला जात आहे. रात्रभर जागरण करून २५ ते ३० ट्रॅक्टर अवैधपणे वाळूचा सर्रासपणे अवैध उपसा करीत आहेत.खुर्लेवाडीकडे येणाऱ्या रस्त्यावर जागोजागी रात्रभर माहिती ठेवली जात असून नवीन दुचाकी किंवा चारचाकी वाहने गोदावरीकडे येताच पात्रात अवैध वाळुची वाहतूक करणारी वाहने आजूबाजूच्या शेतात लपवली जात आहेत. हे गाव तालुक्यापासून दूर अंतरावर असल्याने वाळू चोरांना रान मोकळे झाले आहे. रात्रभर येथील वाळूचा उपसा करून त्याची रातोरात विक्री केली जात आहे. अनेकदा वाळू उपशासाठी जेसीबीचा वापरही केला जातो. त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा फटका बसत असून खुर्लेवाडी परिसरात वाळू चोरटे सक्रीय झालेले आहेत. आजूबाजूच्या परिसरात ग्रामस्थांनी वाळू चोरी बंद पाडल्याने चोरांनी आपला मोर्चा खुर्लेवाडीकडे वळविला आहे. गोदावरीच्या पात्रात रात्रभर वाहनांचा वापर वाढला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन अवैध वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी होत आहे.उपाययोजना करूनही वाळू उपसा थांबेनाच्पालम तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने दंडात्मक कारवाई, रस्त्यावर जेसीबीने खोदकाम आदी उपाययोजना राबवूनही अवैध वाळू उपसा काही केल्या थांबेनासा झाला आहे.च्त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन खुर्लेवाडी व शिवारातून होणारा अवैध वाळू उपसा त्वरित थांबवावा, अशी मागणी गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांमधून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग