शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

परभणी : परदेशी पाहुण्यांनी गजबजला डोंगरमाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:55 IST

मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आणि जागोजागी निर्माण झालेले नैसर्गिक पाणवठे, तलाव आणि प्रकल्पांमुळे जिंतूर तालुक्याला नैसर्गिक देणगी लाभली असून यावर्षी या गावांतील निसर्ग अधिकच फुुलला आहे. या सौंदर्यात भर घालण्यासाठी विविध विदेशी पाहुण्यांनी तालुक्यातील डोंगरमाथ्यांवर आणि पाणवठ्यांवर ८९ देशी आणि विदेशी पक्ष्यांची नोंद पक्षीमित्रांनी घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आणि जागोजागी निर्माण झालेले नैसर्गिक पाणवठे, तलाव आणि प्रकल्पांमुळे जिंतूर तालुक्याला नैसर्गिक देणगी लाभली असून यावर्षी या गावांतील निसर्ग अधिकच फुुलला आहे. या सौंदर्यात भर घालण्यासाठी विविध विदेशी पाहुण्यांनी तालुक्यातील डोंगरमाथ्यांवर आणि पाणवठ्यांवर ८९ देशी आणि विदेशी पक्ष्यांची नोंद पक्षीमित्रांनी घेतली आहे.येलदरीसारखा विस्तीर्ण जलाशय, सह्याद्रींच्या डोंगररांगानी जिंतूर तालुक्याला नैसर्गिक सुबत्ता प्राप्त करुन दिली आहे. याशिवाय परभणी जिल्ह्यातील एकमेव वनक्षेत्र जिंतूर तालुक्यातच वसलेले आहे. त्यामुळे निसर्गातील पशु-पक्ष्यांसाठी जिंतूर तालुका हा आवडीचा आणि सुरक्षिततेचाच आधिवास असून दरवर्षी या तालुक्यात वेगवेगळे पक्षी दाखल होतात. पावसाळा संपल्यानंतर तालुक्यातील अनेक गावतलावात आणि छोट्या-मोठ्या पाणवठ्यांमध्ये जलसाठा झालेला असतो. त्यामुळे हे पक्षी पावसाळ्यानंतर या भागात पहावयास मिळतात. तालुक्यातील पक्षीमित्र असलेल्या अनिल उरटवाड, गणेश कुºहा, विजय ढाकणे यांनी ठिकठिकाणी भ्रमंती करुन जुन्या आणि नव्या पक्ष्यांच्या नोंदी टिपल्या आहेत.अनिल उरटवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्याच्या क्षेत्रात ८९ प्रकारच्या पक्ष्यांची नोंद घेण्यात आली आहे. त्यामध्ये पाण्यावर विहार करणाऱ्या पक्षांबरोबरच डोंगरी आणि वनक्षेत्रातील पक्ष्यांचाही समावेश आहे. वेगवेगळ्या पक्षांनी तालुक्याच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घातली आहे. येलदरी प्रकल्पाचा जलाशय, कवडा येथील डोंगरी भाग, तळ्याचा परिसर, येनोली, नेमगिरी, भोगाव या भागातील तळ्यांच्या परिसरात या पक्ष्यांची नोंद घेण्यात आली आहे.विदेशातून आलेले पक्षी४ईरोसीयन स्पूनबिल (चमचा), लेसर व्हीस्टलिंग डक (अढई), स्पॉट बिल डक (हळदी-कुंकू), कॉमन पोचार्ड (लालसरी), टफ्टेड डक (शेंडी बदक), नॉब ब्लिड डक (नकटा बदक), नॉर्थन पिंटाईल (तलवार बदक), नॉर्थन शॉलवेलर (थापट्या बदक), काळ्या डोक्याचा शटारी, गुलाबी मैना, चंद्राग बदक.स्थानिक पक्षी४नदी सुरय, टिबुकली, छोटा पान कावळा, गाय बगळा, मोठा बगळा, राखी बगळा, जांभळा बगळा, वंचक, रंगीत करकोचा, पांढºया मानेचा करकोचा, कापसी घार, शिक्रा, पांढºया छातीची पाणकोंबडी, जांभळी पानकोंबडी, वारकरी, शेकाट्या, टिटवी, तपकिरी व्होला, ठिपकेवाला व्होला, कोकिळा, भारद्वाज, नीळकंठ, खंड्या, हुदहुद्या, वेडा राघू, बुलबुल, सूर्यपक्षी, मैना, कोतवाल, कावळा.चार वर्षांपासून जिंतूर तालुक्यात दाखल होणाºया पक्ष्यांचा अभ्यास करीत आहे. या पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी वारंवार पक्ष्यांच्या निरीक्षणाच्या मोहिमा आखल्या जातात. त्यातूनच या नोंदी घेण्यात आल्या आहेत.-अनिरु उरटवाड, पक्षीमित्र

टॅग्स :parabhaniपरभणीbirds sanctuaryपक्षी अभयारण्यwildlifeवन्यजीव