शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : एटीएमच्या सहाय्याने खात्यातून परस्पर लांबविले २२ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:59 IST

एटीएम कार्डाचा क्रमांक हस्तगत करुन अज्ञात तीन आरोपींनी एका महिलेच्या बँक खात्यातून २२ हजार रुपये काढून घेतल्याची घटना परभणी शहरात घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : एटीएम कार्डाचा क्रमांक हस्तगत करुन अज्ञात तीन आरोपींनी एका महिलेच्या बँक खात्यातून २२ हजार रुपये काढून घेतल्याची घटना परभणी शहरात घडली आहे.या संदर्भात सुनील बापुसाहेब गोंडे यांनी नवा मोंढा पोलिसांकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार ९ मे रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सुनील बोंडे हे वसमत रोडवरील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रावर गेले होते. पत्नीच्या नावे असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या माजलगाव शाखेतील खात्यातून पैसे काढण्याच्या उद्देशाने ते या एटीएम केंद्रावर आले. दरम्यान, एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकल्यानंतर ते अडकले. त्यामुळे या केंद्रावर असलेल्या अज्ञात तीन व्यक्तींनी अडकलेले एटीएम कार्ड काढून दिले. तुम्ही या कार्डातून पैसे उचलू शकत नाहीत, असे या व्यक्तींनी सांगितले. त्यामुळे सुनील बोंडे हे त्या ठिकाणाहून निघून गेले; परंतु, तेवढ्यात आरोपींनी एटीएमकार्डचा कोड नंबर जाणून घेतला आणि या खात्यातून २२ हजार रुपये काढून घेतले. ९ मे रोजी ही घटना घडल्यानंतर सुनील बोंडे यांनी १० मे रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यावरुन अज्ञात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक बोंडले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.बामणीत दोन जुगाऱ्यांविरुद्ध कारवाईलोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळवित असताना पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. बामणी येथे पोलिसांनी छापा टाकला, त्यावेळी उत्तम केरोजी रणखांब, लक्ष्मण लिंबाजी नेमाडे हे दोघे मटका खेळवित असताना आढळले. दोघांविरुद्धही गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीatmएटीएमCrime Newsगुन्हेगारी