शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

परभणीकरांची बातच न्यारी: ज्याने शिवसेना सोडली त्याला जनतेने सोडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 08:32 IST

Shiv sena: शिवसेनेच्या तिकिटावर जे निवडून आले त्यापैकी ज्यांनी सेना सोडली त्यांना जनतेनेच सोडून दिल्याचा आजवर जिल्ह्याचा इतिहास आहे. त्यामुळेच ‘परभणीकरांची रीतच न्यारी’ अशी म्हण राजकीय वर्तुळात चर्चेत येत आहे.

- अभिमन्यू कांबळे परभणी : शिवसेनेच्या तिकिटावर जे निवडून आले त्यापैकी ज्यांनी सेना सोडली त्यांना जनतेनेच सोडून दिल्याचा आजवर जिल्ह्याचा इतिहास आहे. त्यामुळेच ‘परभणीकरांची रीतच न्यारी’ अशी म्हण राजकीय वर्तुळात चर्चेत येत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार धोक्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात ५ वेळा शिवसेनेत फूट पडली आहे. असे असताना परभणीतही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या नेत्यांना नंतर मात्र राजकारणात यश मिळाले नसल्याचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

अन् शिवसेनेला राज्यस्तरावर मान्यता १९८९ मध्ये शिवसेनेला पक्षाची मान्यता नसताना सेनेचे अशोकराव देशमुख हे अपक्ष म्हणून पहिल्यांदा परभणी लोकसभेतून निवडून आले होते. त्यानंतर शिवसेनेला राज्यस्तरावर पक्षाची मान्यता मिळाली. त्यामुळे १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत अशोकराव देशमुख हे शिवसेनेकडून पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून आले. १९९६ मध्ये शिवसेना सोडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि या वर्षीच्या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश जाधव यांनी पराभव केला.    

१९९८ च्या लोकसभा निवडणुकीत १८ महिने चाललेल्या सरकारच्या वेळी काँग्रेसचे सुरेश वरपूडकर विजयी झाले. हा शिवसेनेच्या स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीचा एकमेव अपवाद. त्यावेळी शिवसेनेचे सुरेश जाधव पराभूत झाले. १९९९ मध्ये पुन्हा सेनेकडून जाधव निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या रावसाहेब जामकर यांचा पराभव केला. नंतरच्या कालावधीत जाधव यांनी शिवसेना सोडली. 

२००४ च्या निवडणुकीत ॲड. तुकाराम रेंगे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. त्यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश वरपूडकर यांचा पराभव केला. नंतर त्यांनी शिवसेना सोडली आणि २००९ मध्ये काँग्रेसकडून परभणी विधानसभा लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे तत्पूर्वी १९९५ व १९९९ असे दोन वेळा ॲड. रेंगे पाटील शिवसेनेच्या तिकिटावर परभणी विधानसभेतून निवडून आले होते.  

तसेच १९९० मध्ये हनुमंतराव बोबडे परभणी विधानसभेतून शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले होते. नंतर त्यांनी शिवसेना सोडली. ते पुन्हा लोकनियुक्त प्रतिनिधी होऊ शकले नाहीत.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाparbhani-pcपरभणी