शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कृषी विद्यापीठाला २३ कोटींचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:43 IST

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला राज्य शासनाने एकूण २३ कोटी ५४ लाख ८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यामध्ये ४ कोटी ८९ लाख रुपये वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपुर्तीसाठी देण्यात आले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला राज्य शासनाने एकूण २३ कोटी ५४ लाख ८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यामध्ये ४ कोटी ८९ लाख रुपये वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपुर्तीसाठी देण्यात आले आहेत़राज्य शासनाने २००० ते २००१ या आर्थिक वर्षापासून कृषी विद्यापीठाला अनुदान मंजूर करण्यासाठी सुधारित सहाय्यक अनुदान सूत्र निश्चित केले आहे़ त्यानुसार राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना २०१९-२० या आर्थिक वर्षाकरीता ‘२४५१’ कृषी विषयक संशोधन व शिक्षण या मुख्य लेखाशीर्षाखाली पीक संवर्धन सहाय्यक अनुदान भांडवली मत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान आदींसाठीची तरतूद केली आहे़ त्यानुसार परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकरीता २०१९-२० या आर्थिक वर्षाकरीता १७० कोटी ९४ लाख ४० हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे़ त्यापैकी आतापर्यंत ४३ कोटी ४८ लाख १ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून, आता ९ आॅगस्ट रोजी नव्याने आदेश काढून २३ कोटी ५४ लाख ८ हजारांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे़ त्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी प्रतिपूर्तीसाठी तरतूद करण्यात आलेल्या १४ कोटी ६७ लाख रुपयांपैकी ४ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे़४या शिवाय वेतनेत्तर अनुदान, भांडवलीमत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान, वेतन सहाय्यक अनुदान आदी अंतर्गत २ कोटी ९३ लाख ३६ हजार रुपये वितरित करण्यात आले आहे़त.तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद अर्थसहाय्यीत योजनेंतर्गत १ कोटी २० लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत़४या निधीमुळे कृषी विद्यापीठातील विकास कामांना चालणार मिळणार आहे़ तसेच वेतन व वेतनेत्तर अनुदानाचा प्रश्न सुटणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठfundsनिधीStudentविद्यार्थी