शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: खंडाळीतील ग्रामस्थांचा ग्रामसेवकास घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:42 IST

तालुक्यातील खंडाळी येथे टँकर सुरु करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करुन दोन महिन्याचा कालावधी लोटला. मात्र अद्यापपर्यंत टँकर सुरु झाले नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी २ एप्रिल रोजी ग्रामसेवकाला घेराव घालून तीन तास समाज मंदिरात बसवून ठेवले. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने अखेर ग्रामसेवकाची सुटका करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): तालुक्यातील खंडाळी येथे टँकर सुरु करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करुन दोन महिन्याचा कालावधी लोटला. मात्र अद्यापपर्यंत टँकर सुरु झाले नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी २ एप्रिल रोजी ग्रामसेवकाला घेराव घालून तीन तास समाज मंदिरात बसवून ठेवले. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने अखेर ग्रामसेवकाची सुटका करण्यात आली.तालुक्यातील खंडाळी येथील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने गावात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत पाणीटंचाई निवारणासाठी टँकर मागणीचा ठराव घण्यात आला. २६ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीने पंचयात समितीकडे प्रसव दाखल केला. त्यानंतर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली. मात्र २ महिने उलटूनही टँकर सुरु झाले नसल्याने संतापलेल्या महिला व ग्रामस्थांनी २ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता गावात आलेले ग्रामसेवक एम.व्ही. नवटके यांना जाब विचारला. त्यानंतर ग्रामसेवक नवटके यांना घेराव घालून तीन तास समाज मंदिरात बसवून ठेवले. ही माहिती पंचायत समितीला मिळाल्यानंतर गटविकास अधिकारी प्रवीण सुराडकर, तहसीलदार स्वरुप कंकाळ यांनी भ्रमणध्वनीवरुन खंडाळी ग्रामस्थांशी संवाद साधला. लवकरच टँकर सुरु करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामसेवकाची सुटका केली. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तराव पवार, राजाराम पवार, सरपंच मोतीराम कोल्हे, कोंडिबा जंगले, माजी सरपंच सदाशिव भोसले, नितीन पवार, गंगाराम भोसले, बाबुराव भोसले, रामकिशन जंगले, सखाराम जंगले, अंजनाबाई माळवे, रंभाबाई हासले, वैशाली जंगले, छायाबाई जंगले, सुशिला जंगले, संगिता पवार, सागरबाई कोल्हे, मुक्ताबाई कोल्हे, जनाबाई भोसले, राधाबाई भोसले, भगवान भोसले, नारायण भोसले, बाळू सूर्यवंशी, राम कोल्हे, श्रीरंग भोसले, माधव सूर्यवंशी आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईagitationआंदोलन