लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : फिल्टर का चालू केले नाही, या कारणावरून ग्रामसेवकाला मारहाण केल्या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़नागरजवळा येथील ग्रामसेवक भिका वाधू साबळे हे १६ एप्रिल रोजी ग्रामपंचायतमध्ये थांबले असताना ग्रा़पं़ सदस्य प्रल्हाद रतन होगे यांनी फिल्टर का चालू केले नाहीस, म्हणून मारहाण केली़ साबळे यांच्या तक्रारीवरून होगे यांच्याविरूद्ध मानवत पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे़ उपविभागीय पोलीस अधिकारी पी़ के़ एकबोेटे तपास करीत आहेत़
परभणी : ग्रामसेवकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:46 IST