शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ग्रा.पं. सदस्यांचे मानधन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चारठाणा ( परभणी ) : जिंतूर तालुक्यातील १०९३ ग्रा.पं. सदस्य व १३५ सरपंचांचे मागील दोन वर्षांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कचारठाणा (परभणी) : जिंतूर तालुक्यातील १०९३ ग्रा.पं. सदस्य व १३५ सरपंचांचे मागील दोन वर्षांपासून मानधन रखडले आहे. पंचायत विभागाला शासनाकडून मानधन प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात येत असले तरी दोन वर्षांपासून या ग्रा.पं. सदस्य व सरपंचांना मासिक भत्त्याची प्रतीक्षा लागली आहेत.जिंतूर तालुक्यात एकुण १३६ ग्रामपंचायती असून १३५ सरपंच सध्या कार्यरत आहेत. तर एका सरपंचाचे पद रिक्त असल्याने तेथील पदभार उपसरपंचाकडे आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये एकूण १०९३ सदस्य आहेत. या सदस्यांना पूर्वी केवळ २५ रुपये मासिक सभेचा भत्ता दिला जात होता; परंतु, यानंतर यामध्ये वाढ करण्यात येऊन २०० रुपये मानधन करण्यात आल्याची घोषणा शासनाने केली होती; परंतु, या घोषणेची अजूनही अंमलबजावणी झाली नाही. सरपंचाला मासिक ५०० रुपयांवरुन दरमहा १००० रुपये मानधन करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र हंी घोषणा देखील हवेत विरली आहे. असे असले तरी जानेवारी २०१७ पासून आता पर्यंतचे सरपंच व सदस्यांचे मानधन प्रलंबित आहे. दोन वर्षाचा कालावधी लोटला तरी अद्यापपर्यंत मानधन मिळाले नाही. जिंतूर तालुक्यातील ५० टक्के ग्रा.पं.च्या निवडणुका पहिल्या टप्प्यात मे-जून २०१५ मध्ये झाल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१५ मध्ये उर्वरित काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रा.पं. सदस्यांचे आता काही महिनेच शिल्लक राहिले असताना देखील ते मासिक मानधनापासून वंचित आहेत. याबाबत पंचायत समितीच्या पंचायत विभागाशी संपर्क साधला असता मागच्या दोन वर्षापासून आमच्याकडे शासनाकडून मानधनाचा निधी प्राप्त झाला नसल्याने आम्ही संबधित ग्रामपंचातीना मानधन रक्कमेचे धनादेश पाठविले नसल्याचे सांगण्यात आले. एकंदरीत या प्रकरणी प्रशासकीय पातळीवर कुठलेच नियोजन नसल्याने मागच्या दोन वर्षापासून संबधित सरपंच व ग्रा.पं. सदस्यांचे मानधन रखडले असल्याने सरपंच व ग्रा.पं.सदस्यांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच