शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शासकीय दुध डेअरीतील संकलन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:35 IST

आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील दूध उत्पादकांनाही बसला असून, येथील शासकीय दूध डेअरीमध्ये होणारे दुधाचे संकलन प्रतिदिन सुमारे ५ हजार लिटरने घटले आहे़ त्यामुळे शेतीबरोबरच या जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाही अडचणीत आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील दूध उत्पादकांनाही बसला असून, येथील शासकीय दूध डेअरीमध्ये होणारे दुधाचे संकलन प्रतिदिन सुमारे ५ हजार लिटरने घटले आहे़ त्यामुळे शेतीबरोबरच या जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाही अडचणीत आला आहे़जिल्ह्यात खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण हंगाम मानला जातो़ या हंगामात कापूस आणि सोयाबीन ही नगदी पिके घेवून शेतकरी आपल्या उत्पादनात भर घालतात़ मागील काही वर्षांपासून शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय वाढीस लागला आहे़ इतर जिल्ह्याच्या तुलनेत परभणी जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय मर्यादित स्वरुपाचा असला तरी अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळले असून, दूध उत्पादनातून आर्थिक स्त्रोत वाढविले जात आहेत़ यावर्षी उन्हाळ्यामध्ये चाºयाचा प्रश्न निर्माण झाला होता़ त्याचा परिणाम या व्यवसायावर झाला़ दुधाचे उत्पादन कमी झाल्याने उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागला़ जून महिन्यापासून जिल्ह्यात पावसाळ्याला प्रारंभ झाल्यानंतर ओला चारा वाढेल, अशी अपेक्षा होती़ मात्र सुरुवातीच्या काळात पाऊस झाला नाही़ त्यामुळे ओला चाराही निर्माण झाला नाही़ त्यानंतर आॅक्टोबर महिन्यामध्ये जिल्हाभरात अतिवृष्टीने थैमान घातले़ या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस या दोन्ही उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्याच जोडीला दुग्ध व्यवसायालाही फटका बसला आहे़ संपूर्ण महिन्यात सातत्याने ओल राहिल्यामुळे पुरेसा चारा जनावरांना मिळाला नाही़ त्यामुळे दुधाचे उत्पन्न घटले आहे़ परभणी येथील शासकीय दूध डेअरीमध्ये दररोज दूध संकलन केले जाते़ ५० हजार लिटर क्षमतेची ही दुध डेअरी असून, या दुध डेअरीतही सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत आॅक्टोबर महिन्यात दुधाचे संकलन घटले आहे़ येथील दुध डेअरीत दररोज सर्वसाधारणपणे २५ हजार लिटर दुधाचे संकलन होते़ संकलित केलेल्या या दुधावर प्रक्रिया करून हे दूध पुणे, मुंबई येथील दुध डेअरींना पुरवठा केले जाते़ सप्टेंबर महिन्यात सरासरी २५ हजार ७२ लिटर दुधाचे संकलन झाले असून, आॅक्टोबर महिन्यामध्ये हे संकलन २० हजार ६७४ लिटरवर येऊन ठेपले आहे़ सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत आॅक्टोबर महिन्यात तब्बल ५ हजार लिटर दूध संकलनात घट झाली़ विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यातही दूध संकलनात वाढ झाली नसल्याचे दिसत आहे़ या महिन्यात प्रतिदिन सरासरी १८ हजार लिटरपर्यंतच दुधाचे संकलन होत असून, सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत प्रतिदिन तब्बल ७ हजार लिटर दुधाची घट झाल्याची माहिती दूध डेअरीतून मिळाली़ आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीचा फटका दूध उत्पादकांना बसला आहे़ दुध संकलनात मोठी घट झाल्याने दूध उत्पादकही अडचणीत सापडले आहेत़ त्यामुळे या व्यवसायाला उभारी देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी दुध उत्पादकांतून होत आहे़दूध उत्पादकांचे थकले पैसेशासकीय दूध डेअरीमध्ये दूध विक्री केल्यानंतर दूध उत्पादक संस्थांना १० दिवसांतून एक वेळा पेमेंट दिले जाते़ मात्र २० सप्टेंबरपासून दूध उत्पादकांचे पेमेंट थकले आहे़ राज्यस्तरावरून नियमित पेमेंट दिले जात नसल्याने दूध उत्पादकांसमोर नव्या अडचणी उभ्या टाकल्या आहेत़ दरम्यान येथील जिल्हा दुध डेअरी प्रशासनाने औरंगाबाद येथील प्रादेशिक दुध व्यवसाय अधिकाऱ्यांकडे दूध उत्पादकांच्या ३१ डिसेंबरपर्यंतच्या पेमेंटपोटी ९० लाख ६४६ रुपयांची मागणी केली असून, अद्यापपर्यंत निधी उपलब्ध झाला नाही़ त्यामुळे ५० दिवसांपासून दुध उत्पादक हक्काच्या पैशांसाठी प्रतीक्षेत आहेत़ अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि त्यात दूध संकलनाचे पैसेही थकल्याने उत्पादकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत़दुध संकलन केंद्रातून घटले संकलन४परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ४ दूध संकलन केंद्र आहेत़ सप्टेंबर महिन्यामध्ये परभणी येथील दूध संकलन केंद्रातून ९ हजार ७५३ लिटर तर आॅक्टोबर महिन्यात ८ हजार २७६ लिटर दुधाचे संकलन करण्यात आले़४पाथरीत सप्टेंंबर महिन्यात ८ हजार ७४४ तर आॅक्टोबर महिन्यात ६ हजार ५५ लिटर दुध संकलित झाले़ हिंगोली येथून सप्टेंबर महिन्यात १ हजार ९८२ तर आॅक्टोबर महिन्यात १ हजार ३९५ लिटर दुधाचे संकलन करण्यात आले़४गंगाखेड केंद्रावरूनही दुधाच्या संकलनात घट झाली असून, सप्टेंबर महिन्यात या केंद्रातून ४ हजार ५९३ लिटर प्रतिदिन दूध संकलित झाले होते़ आॅक्टोबर महिन्यात ४ हजार ४२ लिटर दुध संकलित झाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीmilkदूध