शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : गोदाकाठचा ऊसपट्टा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:51 IST

तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी डिग्रस बंधाऱ्यातून यावर्षी नांदेडला सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे गोदाकाठचा ऊसपट्टा धोक्यात आला असून ५ हजार हेक्टरवरील ऊस पाण्याअभावी मोडून टाकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी डिग्रस बंधाऱ्यातून यावर्षी नांदेडला सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे गोदाकाठचा ऊसपट्टा धोक्यात आला असून ५ हजार हेक्टरवरील ऊस पाण्याअभावी मोडून टाकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.डिग्रस बंधाºयातील पाणीसाठा नेहमीच शेतकºयांसाठी टांगती तलवार बनला आहे. नांदेडसाठी कधी पाणी नेले जाईल, याचा नेम राहिला नाही. दरवर्षी मार्च महिन्यात पाणी पळविले जाते. मात्र यावर्षी प्रशासकीय यंत्रणेच्या वरदहस्ताने डिसेंबर महिन्यातच पाणी सोडण्यात आले आहे. या पाणीसाठ्याच्या विश्वासावर गोदाकाठच्या शेतकºयांनी लाखो रुपये खर्च करुन ऊस लागवड केली आहे. हा भाग शुगर बेल्ट म्हणून ओळखला जावू लागला. मात्र अचानक २२ डिसेंबर रोजी डिग्रस बंधाºयातून २० दलघमी पाणी नांदेडला सोडण्यात आल्याने गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. मागील वर्षी लागवड केलेल्या उसाला पुढील काळात पाणी उपलब्ध होणे मुश्कील झाले आहे. शेतातील ऊस, कारखान्यांना देऊन या पिकावर नांगर फिरविण्याची तयारी शेतकºयांनी केली आहे. पाणी नसल्याने ऊस मोडल्यामुळे लागवडीमध्ये मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. पालम तालुक्यातील डिग्रस, फरकंडा, जवळा, गुळखंड, फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी, धनेवाडी, खुर्लेवाडी, रावराजूर, सावंगी ही तेरा गावे तर पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे, मुंबरे, महागाव, कळगाव, गोळेगाव, देऊळगाव, देवठाणा, वझूर आदी २१ गावांतील शिवारात उभ्या असलेल्या उसाच्या पिकाला धोका निर्माण झाला आहे. राजकीय व प्रशासकीय धोरणाचा शेतकºयांना दगाफटका बसला आहे.उत्पादकांना मदतीची गरज४उसाच्या पिकासाठी शेतकºयांनी मशागत, उसाचे बेणे, रासायनिक खत, मजुरी यावर लाखो रुपयांचा खर्च केलेला आहे. हे पीक दोन वर्षे उत्पादन देते म्हणून शेतकºयांनी मागील वर्षी लागवड केलेल्या उसातून उत्पादन खर्चही निघने कठीण बनले आहे. पाण्याअभावी ऊस मोडावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.शेतकरी हवालदिल४बंधाºयातील पाणीसाठ्याच्या भरोस्यावर शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली होती; परंतु, डिग्रस बंधाºयातून अचानक पाणी सोडल्याने शेतकºयांवर मोठे संकट कोसळले आहे. अगोदरच खरीप व रबी हंगामातील पिकांनी धोका दिला आहे. उसाचे पीक चार पैसे मिळवून देईल, ही आशा होती. मात्र पाणी सोडल्याने यावरही पाणी फेरले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड नाराज झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीriverनदी