शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

परभणी : पाण्याअभावी गोदावरी कोरडी पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:59 IST

तालुक्याला लाभलेला गोदावरीचा विशाल किनारा म्हणजे सोनपेठ तालुक्याचे पाणीदार वैभव! गोदावरीच्या अथांग पाण्यामुळे परिसरातील विहिरी, बोअर यांना मिळणारे मुबलक पाणी येथील शेत शिवारांना बागायती बनवून बारमाही हिरवा शालु नेसवीत असे. त्यामुळे जुने लोक अवर्जून या भागाला गंगथडी या नावाने ओळखत असत. आजघडीला गोदावरी पूर्णत: आटली आहे़ त्यामुळे तालुक्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई भासत आहे

सुभाष सुरवसे।लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): तालुक्याला लाभलेला गोदावरीचा विशाल किनारा म्हणजे सोनपेठ तालुक्याचे पाणीदार वैभव! गोदावरीच्या अथांग पाण्यामुळे परिसरातील विहिरी, बोअर यांना मिळणारे मुबलक पाणी येथील शेत शिवारांना बागायती बनवून बारमाही हिरवा शालु नेसवीत असे. त्यामुळे जुने लोक अवर्जून या भागाला गंगथडी या नावाने ओळखत असत. आजघडीला गोदावरी पूर्णत: आटली आहे़ त्यामुळे तालुक्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई भासत आहे.दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडून गोदावरीला पुर येत असे. दुथडी भरुन वाहणाऱ्या गोदावरीतील मोठमोठे डोह भरुन संपूर्ण उन्हाळ्यातही पाणीपातळी टिकून रहात होती. त्यामुळे गोदाकाठासह परिसरातील शेतकरी ऊस, ज्वारी, गहू, मका, भुईमूग, सुर्यफुल, हरभरा आदी पिके घेत असत. उन्हाळ्यात देखील गोदाकाठचा परिसर हिरवागार राहत होता; परंतु, पाच वर्षांपासून सोनपेठ तालुक्यातील पर्जन्यमान घटत चालले आहे. विहीर व बोअरची अनुक्रमे ३० ते १५० फुटावर असलेली पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून, पाझर तलाव, बंधारे, शेततळे आदी पाणीसाठे कोरडेठाक पडले आहेत. बारमाही पाण्याचा खळखळाट ऐकू येणाºया गोदावरीला सुद्धा आता उतरती कळा लागली आहे. गोदावरीतील मोठमोठ्या डोहांना मार्च महिन्यातच कोरड पडली होती. यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना आता पाणीटंचाईचा समाना करावा लागत आहे. बागायती शेतीला आता वाळवंटाचे स्वरुप प्राप्त होत आहे़गोदापात्रातील विहिरी व बोअरची पाणीपातळी खालावली४सोनपेठ शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांचा पाणीप्रश्न गोदावरीवर अवलंबून असल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु झाली आहे. सध्यस्थितीत गोदाकाठच्या अनेक विहीर व बोअरची पाणीपातळी खालावली आहे़४गोदाकाठच्या बाजुच्या झाडा झुडपांमध्ये अनेक प्रकारच्या पशु पक्ष्यांचा वावर होता; परंतु, आज पाण्याच्या शोधात पक्षी, प्राणी ईतरत्र स्थलांतरीत होत आहेत.४एकंदरीत आजची परिस्थीती पहाता सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठाचे पार वाळवंट झाल्याचे पहावयास मिळत आहे.जनावरांचे हाल४गोदावरी नदी कोरडी पडल्याने मुक्या जनावरांचेही पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत़ विशेषत: वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती वाढली आहे़ शेतशिवारांत पाण्याच्या ठिकाणी फिरत असताना त्यांना संकटांना सामोरे जावे लागत आहे़ त्यांच्यासाठी पानवठे करण्याची मागणी होत आहे़या गावांमध्ये : केले अधिग्रहण४तालुक्यातील वंदन, तिवठाना, शेळगाव, आवलगाव, वडगाव स्टे., पोहंडूळ, पारधवाडी, लोकरवाडी या ८ गावांमध्ये १४ विहीर अधिग्रहण व उंदरवाडी, वैतागवाडी, पारधवाडी, नखतवाडी या ४ वाडी तांड्यावर ५ विहिरींचे अधिग्रहण केले असून नरवाडी आणि कोठाळा येथे दोन टँकर चालू आहेत.४मागील तीन महिन्यांपासून तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासाठी अख्खा दिवस घालावा लागत आहे़ त्यामुळे इतर कामे केव्हा करावीत, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई