शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

परभणी : गंगाखेड, जिंतूर, पूर्णेत दुष्काळ नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:34 IST

जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा व जिंतूर तालुक्यांत दुष्काळ नसल्याचाच निष्कर्ष जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने काढला असून, या संदर्भातील आदेश ३१ आॅक्टोबर रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने काढल्याने तूर्त तरी या तीन तालुक्यांना दुष्काळाच्या सुविधांपासून वंचित रहावे लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा व जिंतूर तालुक्यांत दुष्काळ नसल्याचाच निष्कर्ष जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने काढला असून, या संदर्भातील आदेश ३१ आॅक्टोबर रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने काढल्याने तूर्त तरी या तीन तालुक्यांना दुष्काळाच्या सुविधांपासून वंचित रहावे लागणार आहे़राज्य शासनाने २३ आॅक्टोबर रोजी राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळासृदश्य परिस्थिती जाहीर केली होती़ त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी व सोनपेठ तालुक्यांत गंभीर तर परभणी, पालम व सेलू तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले होते़ आता केंद्र शासनाच्या निकषानुसार दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले़ त्यामध्ये प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीची सत्यमापन समितीकडून तपासणी करण्यात आली़ त्यातील निष्कर्षानुसार जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने राज्यातील १८० तालुक्यांपैकी २९ तालुके या यादीतून वगळले आहेत़ घोषित केलेल्या १५१ तालुक्यांपैकी ११२ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा तर २९ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे़या यादीत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा व जिंतूर या तीन तालुक्यांचा समावेश होईल, असे वाटले होते; परंतु, या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांची ३१ आॅक्टोबरच्या आदेशानुसार निराशा झाली आहे़ यापूर्वी मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेले परभणी, पालम व सेलू हे तीन तालुके आता गंभीर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत़ या तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कतरता, दूरसंवेदन विषयक निकष, मृदू आर्द्रता, पेरणीचे क्षेत्र व पिकांची स्थिती आदी बाबींचा अभ्यास करून तालुक्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत़सुधारित हंगामी पैसेवारीचा कौल गंगाखेड, जिंतूरच्या बाजुने४महसूल विभागाच्या वतीने ३१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील नऊही तालुक्यातील सुधारित हंगामी पैसेवारी निश्चित करण्यात आली. याबाबतचा अहवाल बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला. यामध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या परभणी तालुक्याची पैेसेवारी ४४ पैसे, पालम ४० पैसे, पाथरी ४२.५७ पैसे, सोनपेठ ४३.९२, मानवत ४२.४९, सेलू ४६ पैसे अशी आहे. तर गंगाखेड तालुक्याची ४३.७९ व जिंतूर तालुक्याची ४७ पैसे सुधारित हंगामी पैसेवारी निश्चित झाली आहे. या दोन्ही तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भातील अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर शासनाकडून या संदर्भात सुधारित निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. पूर्णा तालुक्यात मात्र महसूलच्या अहवालानुसार ९४ ते ९५ टक्के पाऊस झाल्याने ५४.२५ पैसे सुधारित पैसेवारी आली आहे. त्यामुळे हा तालुका सध्या तरी दुष्काळ जाहीर होण्यापासून बराच दूर आहे. १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे. त्यानंतर दुष्काळाची खरी परिस्थिती जाहीर होणार आहे.४७९ गावांना सवलती४दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ४७९ गावांना दुष्काळाच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये परभणी तालुक्यातील १११, पालम ८२, पाथरी ५८, मानवत ५४, सोनपेठ ६० व सेलू तालुक्यातील ९४ गावांचा समावेश आहे़४या ४७९ गावांमध्ये जमीन महसुलात सूट, कर्जाचे पूनर्गठण, शेतीशी निगडित कर्ज वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज देयकात ३३.५ टक्के इतकी सूट, शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोच्या कामात शिथिलता, आवश्यक तेथे पाण्याच्या टँकरचा वापर व दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमधील शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित करु नये, असे आदेश जिल्हाधिकाºयांंनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळRevenue Departmentमहसूल विभागState Governmentराज्य सरकार