शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:51 IST

येथील तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना विविध योजनेंतर्गत ३३ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेती उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी हा निधी उपलब्ध झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : येथील तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना विविध योजनेंतर्गत ३३ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेती उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी हा निधी उपलब्ध झाला आहे.पालम शहरातील तालुका कृषी कार्यालयाने राष्टÑीय अन्नसुरक्षा अभियान, शेती यांत्रिकीकरण अभियान, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेतकऱ्यांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविले होते. प्राप्त झालेल्या अजार्तून घटक निहाय सोडत पद्धतीने शेतकºयांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली होती.शासनाने दिलेले उद्दिष्ट व शेतकºयांची निवड करून वेळेवर अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली होती. मार्चएंडच्या अगोदर काम केलेल्या शेतकºयांना अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. यांत्रिकीकरणांतर्गत पलटी नांगर, रोटावेटर, तिरी, पंजी या साहित्यासाठी १५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. कांदा चाळ बांधलेल्या २१ शेतकºयांना १८ लाख ६ हजार रुपयांची देयके अदा करण्यात आली आहेत.पालम येथील कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग असूनही शेतकºयांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रस्ताव दाखल झालेल्या शेतकºयांनाही ४ दिवसांत अनुदान देण्यात येईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी चव्हाण, कृषी अधिकारी गोविंद काळे, पर्यवेक्षक प्रवीण काळे यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीfundsनिधी