शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : चार महिन्यांत ४४ दलघमीची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:22 IST

पाच शहराला पिण्याचे पाणी व हजारो हेक्टरवरील पिकांना सिंचन करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळ्यातील चार महिन्यात केवळ ४४ दलघमी (११ टक्के) एवढीच पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे परभणी, पूर्णासह ग्रामीण भागातील शेकडो गावांवर आगामी काळात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

मोहन बोराडे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): पाच शहराला पिण्याचे पाणी व हजारो हेक्टरवरील पिकांना सिंचन करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळ्यातील चार महिन्यात केवळ ४४ दलघमी (११ टक्के) एवढीच पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे परभणी, पूर्णासह ग्रामीण भागातील शेकडो गावांवर आगामी काळात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.गतवर्षी दुधना प्रकल्पात ८० टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे दोन्ही कालव्याद्वारे रबी हंगाम व उन्हाळी पिकांना पाणी सोडण्यात आले होते. तसेच परभणी, पूर्णा व नांदेड या शहरांना नदीपात्राद्वारे पिण्यासाठी पाणी देण्यात आले होते. त्यामुळे या तिन्ही शहरांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला होता; परंतु, यंदा ५० टक्केच पाऊस झाल्यामुळे दुधनात समाधानकारक जलसाठा होऊ शकला नाही. जून व आॅगस्ट महिन्यातील काही दिवसच पाऊस पडला. तोही भीज पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होऊ शकली नाही. दरवर्षी परतीच्या पावसामुळे दुधनेची पाणीपातळी वाढते. मात्र यंदा परतीचा पाऊस न बरसताच परतल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. आगामी काळात प्रकल्पातील पाण्याचे नियोजन करणे आवश्यक झाले झाले आहे. आगामी नऊ महिने विनापावसाचे असणार आहेत. त्यामुळे शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा विचार केला असता नदीपात्राद्वारे पाणी सोडणे शक्य होणार नाही. कारण नदीपात्राद्वारे पाणी देताना मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होण्याची शक्यता असते. परिणामी पाणीसाठा वेगाने कमी होतो. दरम्यान, परतीच्या पावसाच्या आशा माळल्याने उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्याची गरज आहे.दुधनेवर तीन शहरांची मदारदुधना प्रकल्पातून सेलू तसेच जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर या शहरांना व आठगाव पाणीपुरवठा योजनांना पाणी पुरवठा करण्यात येतो. वर्षाकाठी या योजनेला सुमारे ६ दलघमी पाणी लागते. येलदरी प्रकल्प मृतसाठ्यात असल्याने परभणी व पूर्णा शहराला दुधनेतून पाणी देण्यात आले; परंतु, सद्यस्थितीत समाधानकारक पाणीसाठा नसल्याने दोन्ही शहरांची चिंता वाढली आहे. सेलू, मंठा व परतूर शहराला सद्यस्थितीत तरी पाणीटंचाई भासणार नाही.२२ टक्के जिवंत साठासध्या दुधना प्रकल्पात एकूण १५६.८८ दलघमी पाणीसाठा असून तो ४५.५७ टक्के आहे. यातील ५४.२८ दलघमी जिवंत पाणीसाठा असून त्याची टक्केवारी २२.४१ टक्के आहे. पाटबंधारे विभागामार्फत १५ आॅक्टोबरपर्यंत अधिकृत पावसाळा समजला जातो. त्यामुळे ३१ आॅक्टोबरनंतर प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणीसाठ्याचे नियोजन केले जाते, अशी माहिती प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे सध्या उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरीDamधरण