शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

परभणी : दैठणा येथील बँक चोरी प्रकरणात चौघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:30 IST

मागील महिन्यात दैठणा येथील स्टेट बँकेच्या शाखेचे गज वाकवून चोरीचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने चार आरोपींना अटक केली असून, गंगाखेड तालुक्यातील नळद येथील आरोपीने मुंबईच्या तिघांची मदत घेऊन हा प्रकार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मागील महिन्यात दैठणा येथील स्टेट बँकेच्या शाखेचे गज वाकवून चोरीचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने चार आरोपींना अटक केली असून, गंगाखेड तालुक्यातील नळद येथील आरोपीने मुंबईच्या तिघांची मदत घेऊन हा प्रकार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.२८ जानेवारी रोजी मध्यरात्री दैठणा येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेच्या खिडकीचा गज वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश करीत तिजोरीचे कुलूप तोडले होते. मात्र सायरन वाजल्याने साथीदारांसह तेथून पळ काढला होता. या प्रकरणात गंगाखेड तालुक्यातील नळद येथील आरोपी गोविंद कठाळू काळे याचा समावेश असून, त्याने तीन साथीदारांसह ही चोरी केल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळाली. या आधारे, पोलिसांनी सापळा रचून धसाडी येथून गोविंद काळे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली. तसेच संतोष आनंद हियाल (रा.रावलकेल्ला, ता.बडगर, जि.सहला उडिसा, ह.मु.बांद्रा येथील झोपडपट्टी), विकास ऊर्फ बंटी सादरसिंग मीना (२३, रा.नई आबादी मक्सी, जि.साजापूर मध्यप्रदेश, ह.मु. नालासोपारा), मंगेश ऊर्फ रुपलाल नागले (रा.मोर्शी, जि.अमरावती, ह.मु. नालासोपारा) यांना सोबत घेऊन चोरी केल्याचे सांगितले.गणेश काळे याने दिलेल्या माहितीनंतर उर्वरित तीन आरोपी हे लोणावळा (जि.पुणे) येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनाही ताब्यात घेतले. आरोपींकडे विचारणा केली असता दैठणा येथील बँक फोडल्याचे तसेच गंगाखेड, सोलापूर, लोणावळा व इतर ठिकाणी चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीर फारोखी, किशोर चव्हाण, शंकर गायकवाड, राम काळे, राजेश अगाशे, संजय शेळके यांनी केली.उरुसात वाढल्या भुरट्या चोऱ्यायेथील उरुसात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे़ काही जणांचे मोबाईल, कोणाचे पॉकेट तर महिलांच्या पर्स चोरीच्या घटना घडल्या असून, पोलीस ठाण्यात या घटनांची नोंद करण्यात आली आहे़खानापूर येथील प्रल्हाद गोपाळराव शिंदे यांचा २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल ७ फेब्रुवारी रोजी रात्री चोरीला गेला़ या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, हेकॉ सातपुते तपास करीत आहेत़सेलू येथील अ‍ॅड़ अनिता बन्सी धुळे यांची पर्स ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उरुसातून चोरीला गेली़ अनिता धुळे यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे़ पर्समध्ये १ हजार ५०० रुपये, एटीएम कार्ड, पॅनकार्ड आदी साहित्य असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे़परभणी शहरातील शनिवार बाजार भागातून मोबाईल चोरी झाल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी घडली़ शनिवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने विद्यानगरातील मोहनराव पत्तेवार हे बाजार करण्यासाठी या भागात आले होते़ दुपारी १२ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांचा मोबाईल लांबविला़ या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़दोन मोटारसायकलसह हत्यारे जप्तपोलिसांनी या कारवाईत आरोपींकडून दोन मोटारसायकलसह घरफोडी करण्यासाठी वापरले जाणारे अ‍ॅडस्टेबल पान्हा, पंक्चर काढण्याचा टोचा, लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड आदी साहित्य जप्त केले आहे.विविध ठाण्यांत सहा गुन्हे दाखलआरोपींच्या विरोधात दैठणा पोलीस ठाण्यासह गंगाखेड, सोलापूर (ग्रामीण), लोणार (ग्रामीण), लोणार शहर या पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी