शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अवकाळी पावसाने रस्त्याच्या दुरवस्थेत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 00:24 IST

मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास परभणी शहरासह परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शहरासह परिसरात रस्त्यांच्या दुरवस्थेत भर पडली असून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास परभणी शहरासह परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शहरासह परिसरात रस्त्यांच्या दुरवस्थेत भर पडली असून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले.जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविला होता. या अंदाजानुसार दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून ढगाळ वातावरणामुळे दोन्ही दिवस सूर्यदर्शन झाले नाही. या काळात वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे झोंबणारी थंडी जिल्हावासियांना अनुभवावी लागत आहे.दरम्यान, ३० डिसेंबर रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी झाल्या. त्यानंतर ३१ डिसेंबरच्या पहाटे पाचच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर आणि सखल भागांमध्ये पाणी साचले. या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामधुन वाहनधारकांना मार्ग काढावा लागला. प्रशासकीय इमारतीसमोरील रस्त्यावरील खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.तर जनता मार्केट परिसरात पावसाळ्यामध्ये निर्माण होणारी परिस्थिती मंगळवारीही निर्माण झाली. या भागातील नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहिल्याने नाल्यांतील घाण रस्त्यावर आली होती. त्यामुळे हा रस्ताही दलदलमय झाला होता.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस