शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

परभणी : ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:16 IST

विधान निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांकडून वेगात सुरु असताना प्रशासनही या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय चाचणी शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विधान निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांकडून वेगात सुरु असताना प्रशासनही या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय चाचणी शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे.जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ असून या मतदारसंघात होणाºया निवडणुकांसाठी राजकीय पक्ष वेगवेगळ्या मार्गाने जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. विविध यात्रा आता मतदारसंघात पोहचत असून आपले जाहीरनामे मतदारांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न त्याद्वारे केला जात आहे. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, तसा प्रशासकीय तयारीलाही वेग येत आहे.परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघासाठी २ हजार १७० बॅलेट युनिट हे चेन्नई येथून आणले जाणार आहेत. तसेच १ हजार ६८० कंट्रोल युनिटही उपलब्ध होणार आहेत. मतदाराला आपण कोणाला मतदान केले, हे समजण्यासाठी लागणाºया व्हीव्हीपॅट यंत्रही तामिळनाडूतील धर्मापुरी येथून जिल्हा निवडणूक विभागाला उपलब्ध करुन दिली जाणार आहेत़ १ हजार ८४० व्हीव्हीपॅट यंत्र विधानसभा निवडणुकीत वापरले जाणार आहेत.विधानसभा निवडणुकीसाठी लागणाºया ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय चाचणी शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे. ही चाचणी परभणी शहरातील महापालिकेच्या कल्यााण मंडपम् सभागृहात सुरु करण्यात आली आहे. या प्रथमस्तरीय चाचणीच्या कामाचा आढावा निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांनी शुक्रवारी घेतला. प्रथमस्तरीय चाचणीनंतर ईव्हीएम मशीनचे रँडमायझेशन केले जाणार आहे. या सर्व प्रक्रियेला जवळपास महिनाभराचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जवळपास ११ हजार मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. वगळणीसाठी ७७५ अर्ज तर पत्ता बदलासाठी २ हजार ६८१ अर्ज या विशेष मोहीम कालावधीत प्राप्त झाले आहेत. स्थलांतरणाचेही २५१ अर्ज निवडणूक विभागाला उपलब्ध झाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना नाव नोंदणी, नाव वगळणी, मतदार यादीतील नावात सुधारणा करण्याची शेवटची संधी ३० जुलैपर्यंत देण्यात आली होती. जुलै महिन्यात दुसरा शनिवार आणि रविवार आणि चौथा शनिवार आणि रविवारी विशेष मोहीम राबविण्यात आल्या. या मोहिमेदरम्यान नाव नोंदणी, वगळणी, नावात सुधारणा करण्यासाठी आलेल्या अर्ज १३ आॅगस्टपर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. अंतिम मतदार यादी १९ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.१९ आॅगस्ट रोजी अंतिम मतदार यादी घोषित होणार४विशेष मोहिमेपूर्वी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघात ३ लाख ४८ हजार ४१ मतदार होते. तर परभणी मतदारसंघात ३ लाख १ हजार ३६७, गंगाखेड मतदारसंघात ३ लाख ८५ हजार ८२५ .४पाथरी मतदारसंघात ३ लाख ५० हजार ५४ मतदार होते. विशेष मोहिमेनंतर आता किती मतदार संख्येत वाढ होईल, हे १९ आॅगस्ट रोजी स्पष्ट होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची राहणार नजर४परभणी शहरातील कल्याण मंडपम् सभागृहात ईव्हीएम मशीनच्या प्रथमस्तरीय चाचणी व इतर बाबीवर नजर ठेवण्यासाठी हे सभागृह सीसीटीव्ही कॅमेºयाच्या नजरेत राहणार आहे. सभागृहात आणि सभागृहाबाहेर सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. सीसीटीव्हीसह या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तसेच निवडणूक विभागाचे अधिकारी- कर्मचारी लक्ष ठेवून राहणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019EVM Machineएव्हीएम मशीन