शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :४२ कोटींचा पहिला हप्ता वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:36 IST

बोंडअळीच्या प्रादूर्भावाने झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून त्याचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने ४२ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी तालुक्यांना वितरित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बोंडअळीच्या प्रादूर्भावाने झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून त्याचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने ४२ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी तालुक्यांना वितरित केले आहे.२०१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. हातातोंडाशी आलेले कापसाचे पीक वाया गेल्याने आर्थिक फटका सहन करावा लागला. या शेतकºयांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हाभरातून केली जात होती. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त कापसाचे पंचनामे करुन राज्य शासनाकडे १५७ कोटी ९७ लाख ९१ हजार ६४० रुपयांची मागणी केली होती.दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने एक अध्यादेश काढून राज्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांना मदत जाहीर केली. परभणी जिल्ह्यासाठी १५७ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असून तीन टप्प्यांमध्ये हे अनुदान जिल्ह्याला मिळणार आहे.१५७ कोटी रुपयांचे तीन समान टप्पे करण्यात आले असून त्यात ५२ कोटी ६६ लाख रुपयांचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांच्या याद्याप्रमाणे हे अनुदान त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या खात्यावर वितरित केले आहे. त्यामुळे लवकरच तालुकास्तरावरुन प्रत्यक्ष शेतकºयांना अनुदानाच्या वाटपास सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात हे अनुदान मिळाले असले तरी शेतकºयांच्या खात्यावर त्यांच्या नुकसानीची पूर्ण रक्कम जमा केली जाणार आहे. टप्प्या-टप्प्याने सर्व नुकसानग्रस्तांना अनुदान वाटप होणार आहे. ऐन पेरणी हंगामाच्या पूर्वी बोंडअळीचे पैसे खात्यात पडणार असल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.परभणी तालुक्याला सर्वाधिक निधीजिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या निधीमधून प्रत्येक तालुक्याला निधीचे वितरण करण्यात आले आहे. त्यात परभणी तालुक्याला सर्वाधिक ६ कोटी ८८ लाख ९१ हजार ७३६ रुपये, सेलू तालुक्याला ६ कोटी ५९ लाख ७९ हजार ९६७ , जिंतूर तालुक्याला ६ कोटी ४३ लाख ११ हजार ९१८, पाथरी ४ कोटी २२ लाख २९ हजार २२७, मानवत ५ कोटी ३२ लाख ९१ हजार ४२०, सोनपेठ ४ कोटी २० लाख २५ हजार २२३, गंगाखेड ३ कोटी २६ लाख १ हजार २१, पालम ३ कोटी ४ लाख २५ हजार ५६५ आणि पूर्णा तालुक्याला २ कोटी १४ लाख ४३ हजार ९२३ रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.५२ कोटींचा मिळाला पहिला हप्ताराज्य शासनाकडे जिल्ह्याने १५७ कोटी ९७ लाख ९२ हजार रुपयांची मदत मागविली होती. त्याचा पहिला हप्ता ५२ कोटी ६६ लाख रुपये शासनाने मंजूर केला असून त्यापैकी ४२ कोटी १२ लाख रुपयांचा निधी बिम्स् प्रणालीवर उपलब्ध करुन दिला आहे. हा संपूर्ण निधी शेतकºयांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर दुसºया टप्प्याला प्रारंभ होणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीMONEYपैसाFarmerशेतकरीcottonकापूस