शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘अग्निशमन’चा रोजंदारी कर्मचाऱ्यांवर डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:54 IST

नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरतीला राज्यस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने केवळ तीन रोजंदारी कर्मचाºयांवर या पालिकेच्या अग्निशमन दलाचा डोलारा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरतीला राज्यस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने केवळ तीन रोजंदारी कर्मचाºयांवर या पालिकेच्या अग्निशमन दलाचा डोलारा आहे.तालुक्यातील ५२ गावांसह शहराला आगीच्या संभाव्य धोक्यापासून वाचविण्यासाठी २००९ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष अन्सारी यांनी पालिकेत अग्निशमन दल उभारण्यात यावे, अशी मागणी करीत शासन दरबारी प्रस्ताव सादर केला. राज्य सरकारने ३१ आॅगस्ट २००९ रोजी या प्रस्तावाला मान्यता देत या दलासाठी शासनाने ६४ लाख रुपयांचे अनुदान दिले. पालिकेचे १६ लाख असे एकूण ८० लाख रुपये यासाठी खर्च करण्यात आले. यामध्ये वाहनासाठी २८ लाख तर कर्मचारी निवासाकरिता ३६ लाख ८६ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. २०१२ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष गणेश कुमावत यांनी पाठपुरावा करून अग्निशमन दलासाठी लागणारे वाहन, यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली. मात्र पालिकेला या दलासाठी लागणाºया कर्मचारी भरतीचे अधिकार दिले नसल्याने तीन रोजंदारी कर्मचाºयांची भरती करून हा विभाग चालवावा लागत आहे. पाच वर्षापासून नगरपरिषद संचालनालयाकडून कर्मचारी भरती संदर्भात निर्णय होत नसल्याने रोजंदारी कर्मचाºयांनाच हा विभाग सांभाळावा लागत आहे. या कर्मचाºयांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. या विभागासाठी एकूण ६ पदे मंजूर आहेत. यामध्ये अग्निशमन अधिकारी-१, चालक- १ , फायरमन ४ या पदांचा समावेश आहे. भरतीला हिरवा कंदील मिळाल्यास पालिकेला प्रशिक्षित कर्मचारी मिळतील. तसेच आगीच्या घटना घडल्यास नियंत्रण मिळविणे सोपे होईल.राज्यस्तरावर अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरती संदर्भात निर्णय होत नसल्याने भरती प्रक्रिया प्रलंबित आहे. भरती संदर्भात निर्णय झाल्यास योग्य तो पाठपुरावा केला जाईल.-उमेश ढाकणे,मुख्याधिकारी, नगरपालिका मानवत,तालुक्यातील ५२ गावांसह शहराला प्रशिक्षित कायमस्वरुपी कर्मचारी असलेल्या अग्निशमन दलाचा उपयोग होणार आहे. कर्मचारी भरती संदर्भात नगर परिषद संचालनालय महाराष्टÑ राज्य यांच्याकडे जिल्हाधिकाºयांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.-डॉ. अंकुश लाड,मानवतशहरात एकूण १४ जिनिंग युनिट आहेत. त्यापैकी १२ सुरू आहेत. या युनिटमध्ये कोट्यवधी रुपयांच्या कापसाची खरेदी विक्री केली जाते. या ठिकाणी आगीच्या घटना घडत असतात. प्रशिक्षित कर्मचारी असल्यास आगीवर लवकर नियंत्रण मिळविता येते. यामुळे नुकसान कमी होते.-गिरीश कत्रुवार, अध्यक्ष जिनिंग असोसिएशन

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगEmployeeकर्मचारी