शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वृद्धेला मारहाण करणाऱ्या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:03 IST

जागा विकत का देत नाहीस, या कारणावरून एका वृद्ध महिलेला घरात घुसून मारहाण केल्याची घटना २६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील वझूर येथे घडली़ या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): जागा विकत का देत नाहीस, या कारणावरून एका वृद्ध महिलेला घरात घुसून मारहाण केल्याची घटना २६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील वझूर येथे घडली़ या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़वझूर येथील ज्ञानोबा गणेश लांडे, पुरभाजी ज्ञानोबा लांडे, रोहन ज्ञानोबा लांडे आणि ताडोबा दगडोबा लांडे या चौघांनी २६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घराजवळील जागेवर उकंडा करू नकोस आणि ही जागा आम्हाला का विक्री करत नाहीस, असे म्हणत एका ६० वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिला लोखंडी गज आणि काठीने मारहाण केली़ यात ही महिला जखमी झाली आहे़ मारहाणीदरम्यान, आरोपींनी वृद्ध महिलेचा विनयभंग केला़ या मारहाणीत जखमी झालेल्या महिलेवर परभणी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच ठिकाणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून २९ एप्रिल रोजी रात्री उशिरा चार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़पत्नीच्या मृत्यू प्रकरणी पतीविरूद्ध गुन्हा४पतीच्या त्रासाला कंटाळून पेटवून घेतलेल्या विवाहित महिलेच्या मृत्यूनंतर पतीविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे़ अकोली येथील पुष्पा सतीश मुंडे यांनी २२ एप्रिल रोजी स्वत:ला पेटवून घेतले होते़४उपचारा दरम्यान २८ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला़ रुस्तूम तात्याराव टोम्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात पती सतीश लक्ष्मण मुंडे याच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाPoliceपोलिस