शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मुलींसह प्रियकरांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:18 IST

आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिच्या दोन मुलींसह त्यांच्या प्रियकरांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात १८ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिच्या दोन मुलींसह त्यांच्या प्रियकरांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात १८ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.या संदर्भात मयत वंदना साळवे यांचे वडिल दामोधर डंबाळे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, वंदना साळवे हिचे पती मयत झाल्यानंतर ती सेलू येथेच आपल्याकडे वास्तव्याला होती. वंदना यांच्या मुली उर्मिला व शिवाणी या त्यांच्या सोबत राहत नव्हत्या. त्यामुळे वंदना साळवे नेहमी चिंतेत असायच्या. गुरुवारी घरातील जेवण केल्यानंतर सर्वजण झोपी गेले.शुक्रवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास माझी पत्नी जागी झाली तेव्हा तिला वंदना साळवे या जागेवर आढळल्या नाहीत. त्यामुळे आम्ही सर्वांनी वंदनाचा शोध घेतला. तेव्हा घराच्या पाठीमागील खोलीत ओढणीच्या सहाय्याने वंदनाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.वंदना साळवे यांना त्यांच्या दोन्ही मुलींची वागणूक पटत नव्हती. या दोन्ही मुली व त्यांचे प्रियकर नेहमीच वंदना यांना शिवीगाळ व मारहाण करीत असत. प्रसंगी जीवे मारण्याच्या धमक्याही देत होते. या सर्व प्रकाराला कंटाळून माझी मुलगी वंदना हिने आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.तसेच आत्महत्या करण्यापूर्वी वंदना हिने चिठ्ठीही लिहून ठेवली. त्याचप्रमाणे डाव्या हाताच्या तळहातावर दोन्ही मुली व त्यांच्या दोन्ही प्रियकरांची नावे लिहिली आहेत. वंदना हिच्या आत्महत्येस तिच्या दोन मुली व प्रियकर जबाबदार असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.दामोधर डंबाळे यांनी दिलेल्या या फिर्यादीवरुन उर्मिला दिनेश साळवे, शिवाणी दिनेश साळवे, रवि बबनराव वटाणे, संतोष सोपान गायकवाड या चौघांविरुद्ध आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे, बीट जमादार यु.के. लाड, उमेश बारहाते हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrimeगुन्हाMurderखूनArrestअटक