शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

परभणी : ई-आॅफिसच्या साडेतीन महिन्यांच्या फाईली गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:11 IST

मुंबई येथील मंत्रालयातील ई-आॅफिस प्रणालीच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १ फेब्रुवारी ते २४ मे या कालावधीतील जवळपास १ हजार पेक्षा अधिक फाईल्स गहाळ झाल्या आहेत़ त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या कामाच्या तगाद्यामुळे त्रस्त झाले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुंबई येथील मंत्रालयातील ई-आॅफिस प्रणालीच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परभणीजिल्हाधिकारी कार्यालयाच्या १ फेब्रुवारी ते २४ मे या कालावधीतील जवळपास १ हजार पेक्षा अधिक फाईल्स गहाळ झाल्या आहेत़ त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या कामाच्या तगाद्यामुळे त्रस्त झाले आहेत़कामात पारदर्शकपणा व गतीमानता आणण्याच्या उद्देशाने राज्यात काही जिल्ह्यांमध्ये ई-आॅफिस प्रणाली लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता़ ई-आॅफीस प्रणाली अंतर्गत कार्यालय पेपरलेस करून या संदर्भातील फाईल स्कॅन करून डिजीटल सहीच्या माध्यमातून एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर पाठविली जात होती़ त्यामुळे कोणत्या टेबलवर, कोणती फाईल किती दिवसांपासून प्रलंबित आहे, याची इत्यंभूत माहिती कार्यालयप्रमुखांना संगणकाच्या एका क्लिकवर उपलब्ध होत होती़ ही प्रणाली पारदर्शक असल्याने जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ही प्रणाली लागू करण्यासाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला़ ई-आॅफीस प्रणाली लागू करण्यासंदर्भातील तांत्रिक बाबींची कमतरता असताना व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही मिळाले नसताना विशेष बाब म्हणून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयास यासाठी परवानगी देण्यात आली़ त्यानुसार १ फेब्रुवारी २०१९ पासून जिल्हाधिकारी कार्यालयात ई-आॅफीस प्रणाली सुरू करण्यात आली़ त्यानंतर आलेली प्रत्येक फाईल स्कॅन करून ती डिजीटल स्वाक्षरीच्या माध्यमातून संबंधित टेबलवरून जबाबदार अधिकाºयांमार्फत पूर्ण होऊ लागली़ जवळपास २४ मेपर्यंत ही प्रक्रिया सुरळीत होती़ २४ मे रोजी अचानक मुंबईतील मंत्रालयातील ई-आॅफीस प्रणालीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला व ई-आॅफीसची संपूर्ण प्रक्रिया बंद पडली़ त्यामुळे परभणीसह औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी जिल्ह्यांमधील ई-आॅफीसचे कामकाज ठप्प झाले़ १५ जून रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास बºयाच प्रयत्नानंतर मुंबईतून ई-आॅफीस प्रणाली पूर्ववत झाली़ त्यानंतर एका फाईलवरून दुसरी फाईल पाठविली जाऊ लागली; परंतु, जुन्या प्रकरणातील फाईल्स व या संदर्भातील डाटा दिसेनासा झाला़ गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात जुना डाटा रिकव्हर करण्यासाठी प्रयत्न होत आहेत़यासाठी मुंबईतील मुख्य सर्व्हरच्या ठिकाणी एनआयसीमार्फत संपर्क साधण्यात येत आहे; परंतु, जुना डाटा रिकव्हरच होत नाही़ त्यामुळे १ फेब्रुवारी ते २४ मेपर्यंतच्या १ हजारापेक्षा अधिक फाईल्स गहाळ झाल्या आहेत़ अशातच आता लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी व त्यानंतरच्या प्रकरणातील फाईल्सवर काय निर्णय झाले? यासाठीचा पाठपुरावा संबंधित गावातील लोकप्रतिनिधी, नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करू लागले आहेत़ अशा नागरिकांना किंवा लोकप्रतिनिधींना या संदर्भात उत्तरे देताना अधिकारी व कर्मचाºयांच्या नाकी नऊ येत आहेत़ यातून वादावादीचे प्रकार घडत आहेत़ १९ जून रोजीही जिल्हाधिकारी कार्यालयात असाच प्रकार घडला़ त्यामुळे काय करावे? असा प्रश्न अधिकारी व कर्मचाºयांसमोर उपस्थित झाला आहे़विविध विभागांच्या कामकाजावर होतोय परिणामच्जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-आॅफीस प्रणालीचे कामकाज १५ जून रोजी सायंकाळी ६ नंतर पूर्ववत झाले़ त्यानंतर गेल्या १७ जूनपासून ई-आॅफीस प्रणाली अंतर्गत कामकाज सुरू आहे़च्असे असले तरी १ फेब्रुवारी ते २४ मेपर्यंतच्या जुन्या फाईल्स कोणाच्या टेबलवर प्रलंबित आहेत, हेच कळेनासे झाले आहे़ त्यामुळे या फाईल्सवरील कारवाईबाबत विचारणा करण्यासाठी नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहेत़च्यावेळी या नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकारी- कर्मचारी हतबल होत आहेत़ यातून वादा-वादीचे प्रकार घडत आहेत़ परिणामी दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम दिसून येत आहे़मुंबईहून सुरळीत होण्याचाच सातत्याने मिळतोय निरोपजिल्हा कचेरीतील जिल्हा सूचना अधिकारी सुनील पोटेकर यांच्यापर्यंत सोमवारी जिंतूर तालुक्यातील एक प्रकरण गेले़ यावेळी त्यांनी मुंबई येथील प्रमुख कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांना लवकरच जुना डाटा रिकव्हर करून दिला जाईल, असे सांगण्यात आले़ प्रत्यक्षात दिवसभर तसे घडलेच नाही़

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारी