शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

परभणी : आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : गारपीटग्रस्त भागाची फेर तपासणी करुन १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आश्वासन नायब तहसीलदार वाय.बी. गजभार यांनी दिल्याने येथील तहसील कार्यालयासमोर इसाद येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे.इसाद येथे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे ज्वारी, हरभरा, करडई, केळी, पपई, टरबूज आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : गारपीटग्रस्त भागाची फेर तपासणी करुन १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आश्वासन नायब तहसीलदार वाय.बी. गजभार यांनी दिल्याने येथील तहसील कार्यालयासमोर इसाद येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे.इसाद येथे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे ज्वारी, हरभरा, करडई, केळी, पपई, टरबूज आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.शेतात गारांचा खच पडला असतानाही कृषी सहाय्यक, तलाठी यांनी इसाद येथे गारपीटीने नुकसान झाले नाही, असा निरंक अहवाल महसूल प्रशासनाला सादर केला होता. त्यामुळे गारपीटीची मदत शेतकºयांना मिळाली नाही. त्यामुळे इसाद येथील ग्रामस्थांनी ६ एप्रिलपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले. या उपोषणाला आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, रासपचे रत्नाकर गुट्टे, शिवसेनेचे संतोष मुरकुटे, माधव शेंडगे आदींनी पाठिंबा दिला. या उपोषणाची दखल घेऊन नायब तहसीलदार वाय.बी.गजभार यांनी १५ दिवसांत गारपीटग्रस्त भागाची फेर तपासणी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर इसाद येथील शेतकºयांनी उपोषण मागे घेतले. या उपोषणात भगवान सातपुते, भाऊसाहेब भोसले, किशनराव भोसले, श्रीकांत भोसले, रखमाजी भोसले आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीTahasildarतहसीलदार