शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

परभणी : स्वच्छता अभियान संपताच घनकचरा प्रकल्प बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:35 IST

केंद्र शसनाने गतवर्षी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत परभणी महानगरपालिकेने देशपातळीवर जलद प्रतिसादाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले असले तरी हे अभियान संपताच मनपाने सुरु केलेला घनकचरा प्रक्रिया प्रकल्प बंद केल्याचा प्रकार समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शसनाने गतवर्षी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत परभणी महानगरपालिकेने देशपातळीवर जलद प्रतिसादाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले असले तरी हे अभियान संपताच मनपाने सुरु केलेला घनकचरा प्रक्रिया प्रकल्प बंद केल्याचा प्रकार समोर आला आहे.गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पेतून देशभर शहरी भागांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. यामध्ये स्वच्छ शहर अभियान स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील अनेक शहरांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये परभणी महानगरपालिकेने सहभाग नोंदविला. शहर स्वच्छतेमध्ये परभणी मनपाला पारितोषिक मिळाले नसले तरी नागरिकांना जलद प्रतिसाद व त्यांच्या समस्येचे निराकारण या प्रकारामध्ये मनपाला देशपातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. याचा भव्य पुरस्कार वितरण समारंभही राज्याबाहेर झाला होता. या पुरस्कारानंतर शहरातील स्वच्छता अभियानाला आता आवकळा आल्याचे सातत्याने दिसून येत आहे. स्वच्छता अभियानाच्या कालावधीत शहरातील कचरा टाकण्याची जागा असलेल्या शहरातील धाररोडवरील डंपिंग ग्राऊंड परिसरात घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प मनपाने सुरु केला होता. येथे घनकचºयापासून खत निर्मितीही करण्यात आली. मनपातील आकडेवारीनुसार जवळपास १७ क्विंटल खताची निर्मिती करण्यात आली. त्या माध्यमातून मनपाला जवळपास साडे आठ लाख रुपयांचे उत्पन्नही मिळाल्याचेही सांगण्यात आले. जशी स्पर्धा संपली, तसा हा प्रकल्पही बंद पडला. त्यात तत्कालीन मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची बदली झाल्याने या प्रकल्पाकडे कोणीही पाहिले नाही. परिणामी आता शहरामध्ये दररोज निर्माण होणारा जवळपास ८० मे. टन कचरा डंपिंग ग्राऊंडमध्ये पडत आहे. परिणामी या परिसरात दररोज कचºयाचे ढिग वाढत चालले आहेत. त्यामुळे भविष्यकाळात परभणीतही औरंगाबादप्रमाणे कचºयाची समस्या निर्माण होऊ शकते.कचºयाचे विलगीकरणही थांबलेमनपाच्या वतीने पूर्वी ओला आणि सुका असे कचºयाचे वर्गीकरण केले जात होते़ मुळात घंटागाड्यांमध्येच या पद्धतीने कचरा घेतला जात होता़ तो कचरा डम्पींग ग्राऊंडवर त्याच पद्धतीने टाकला जात होता; परंतु, आता स्वच्छता अभियान संपल्यानंतर कचºयाचे विलगीकरणही थांबविण्यात आले आहे़ परिणामी ओला आणि सुका दोन्ही कचरा एकत्रित संकलित केला जात आहे़धार रोडच्या डम्पिंग ग्राऊंडला विरोधसद्यस्थितीत परभणी शहरातील कचरा धार रोडवरील डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जातो; परंतु, या परिसरातील नागरिकांचा येथे कचरा टाकण्यास विरोध आहे़ शिवाय काही नगरसेवकांनीही येथे कचरा टाकण्यास विरोध केला होता़ त्यामुळे हा कचरा बोरंवड शिवारातील मनपाच्या जागेत टाकण्याचा निर्णय झाला होता़निविदा बारगळल्याधाररोड भागात घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास ५ कोटी रुपयांची निविदा ५ मार्च रोजी काढण्यात आली होती. त्यानंतर घनकचरा प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीकोनातून तातडीने कारवाई होईल, अशी शहरवासियांची अपेक्षा होती; परंतु, प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही.उलट ही प्रक्रिया सद्यस्थितीत ठप्प झाली आहे. मनपाच्या वतीने गंगाखेड रोडवरील बोरवंड परिसरात २.४८ हेक्टर जमीन खरेदी करण्यात आली असून या भागात भविष्यकाळात घनकचरा प्रकल्प उभारण्याचे मनपाचे नियोजन आहे.यासाठी जवळपास १९ कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याचे सांगण्यात आले; परंतु, याबाबतही कोणतीही प्रक्रिया मनपाकडून पुढे सरकली नाही. परिणामी शहराच्या घनकचºयाचा प्रश्न कायम आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाCentral Governmentकेंद्र सरकार