शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

परभणी : कार्यालयाभोवती अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जिंतूर  ( परभणी ) : मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शासकीय कार्यालयाच्या संरक्षण भिंतीजवळ १५० ते २०० ...

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर  (परभणी ) : मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शासकीय कार्यालयाच्या संरक्षण भिंतीजवळ १५० ते २०० अतिक्रमणधारक बसले असून अनेक वेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मात्र अवघ्या पंधरा दिवसांत ही अतिक्रमणे पूर्ववत होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.जिंतूर शहरात दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका अतिक्रमण हटाव मोहीम राबविते. मात्र ही मोहीम केवळ दिखावा ठरते. अतिक्रमण मोहीम राबविल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात ही अतिक्रमणे पूूर्ववत होतात. विशेष म्हणजे शिक्षण विभाग, ग्रामीण रुग्णालय, जि.प. बांधकाम विभाग, लघूसिंचन विभाग, शासकीय गोदाम आदी ठिकाणच्या शासकीय जागा अतिक्रमणधारकांनी बळकावल्या आहेत. नव्हे तर एकही पाठ भिंत अतिक्रमणधारकांनी शिल्लक ठेवली नाही.दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग जिंतूर- फाळेगाव, जिंतूर- जालना, जिंतूर-परभणी या मार्गावरील अतिक्रमणे हटवित असते. संबंधितांना नोटिसा बजावण्याचे काम तत्परतेने करणारा सा.बां. विभाग मात्र मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिक्रमणाकडे सहजतेने बघत आहे. शहरात ४०० ते ५०० दुकाने अतिक्रमणात आहेत. सा.बां. विभागाप्रमाणे न.प.च्या कार्यक्षेत्रातही अतिक्रमणे वाढत आहेत. याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.शहारातील प्रचंड धूळ व दोन्ही बाजूंंची अतिक्रमणे यातून चालताना पादचाºयांचा जीव मेटाकुटीला येत आहे. या शिवाय रस्त्यावर उभे असणारे हातगाडे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण करणारे आहेत. एकीकडे स्वच्छ व सुंदर जिंतूर शहर संकल्पना साकारत असताना अतिक्रमण, रस्त्यावरील हातगाडे, प्रचंड धूळ व ठिकठिकाणी लागलेल्या होर्र्डिंग्ज शहराच्या सुधारणेमध्ये अडसर ठरत आहेत. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित जवळपास सर्वच रस्ते असल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रातील अतिक्रमणाबाबत हा विभाग तत्पर नाही. परिणामी शहराच्या अतिक्रमणात सातत्याने मोठी वाढ झाली आहे.तहसील कार्यालयास अतिक्रमणांचा गराडाजिंंतूर तहसील कार्यालयाच्या चोहूबाजूने अतिक्रमणे झाली आहेत. ही ३० ते ४० अतिक्रमणे असून बॉन्ड पेपर विक्रीच्या नावाखाली सर्रास दुकाने थाटली आहेत. महसूल प्रशासनाने अनेक वेळा येथील अतिक्रमणे काढली खरी. मात्र या मोहिमेनंंतर अवघ्या २४ तासांतच मोठ्या जोमाने ही अतिक्रमणे पुन्हा थाटली आहेत. विशेष १४ जानेवारी रोजी प्रशासनाने अतिक्रमणे काढली होती. मात्र अवघ्या दोन दिवसांत पहिल्यापेक्षा जास्त अतिक्रमणे वाढली आहेत. झेरॉक्स सेंटरच्या नावाखाली अनेक वाहने परिसरात उभी असतात. शिवाय इतर व्यवसायही मोठ्या प्रमाणावर अनधिकृत आहेत.पोटभाडेकरूंची संख्या मोठी४सर्वसामान्य नागरिक उदनिर्वाहासाठी अतिक्रमण करीत असले तरी शहरात काही अतिक्रमणधारकांनी प्रत्येकी ५ ते १० जागेवर अतिक्रमण करून ती जागा इतरांना भाडेतत्वावर दिली आहे. या अतिक्रमणातून दरमहा २५ ते ३० हजार रुपये महिना कमवितात.४अशा अतिक्रमणधारकांची संख्या पंधरा ते वीस असून गरिबांना त्रास देणे, दमदाटी करून पैसा वसूल करणे आदी प्रकार शहरात सर्रास होत असल्याचे दिसून येत आहे.अनधिकृत वीजपुरवठा४या अतिक्रमणधारकांनी अनधिकृतपणे सहजतेने वीजपुरवठा घेतला आहे. अनेकांनी परस्पर वीज जोडली आहे. तर अनेकांनी १०० रुपयांच्या शपथपत्रावर वीज जोडणी व पालिकेची नाहरकत मिळविली आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे फावत आहे. याकडे तहसीलदारांनी लक्ष देऊन अतिक्रमणधारकांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकातून होत आहे.तहसील कार्यालयाच्या आवारात अतिक्रमणे वाढलेली आहेत. सतत अतिक्रमणे होत आहेत.मात्र आठ दिवसांत ही सर्व अतिक्रमणे हटवू.-सुरेश शेजूळ, तहसीलदार, जिंतूर

टॅग्स :parabhaniपरभणीEnchroachmentअतिक्रमण