शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी झाले आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 01:03 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला होता़ त्यामुळे दोन्ही विभागांचे कामकाज ठप्प राहिले़ या संपाला शिक्षकांनीही पाठिंबा देत जिल्ह्यातील शाळा सोडून दिल्या़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला होता़ त्यामुळे दोन्ही विभागांचे कामकाज ठप्प राहिले़ या संपाला शिक्षकांनीही पाठिंबा देत जिल्ह्यातील शाळा सोडून दिल्या़२००५ नंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाºयांना पेन्शन योजना लागू नाही़ त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी ९ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले़ या आंदोलनाला जिल्ह्यातील काही शिक्षक संघटनांनीही पाठींबा दिला़ पेन्शन योजनेबरोबरच सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर कराव्यात, खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करून कंत्राटी कर्मचाºयांना कायम करावे, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत, समान काम समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करावेत, केंद्राप्रमाणे महिलांना प्रसुती, बालसंगोपन रजा व अन्य सवलती लागू कराव्यात, पदोन्नती व सरळसेवेने करण्यात येणारी नियुक्ती यातील प्रारंभिक वेतनातील फरक दूर करावा, चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची पदोन्नती सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार करावी, अनुकंपा भरती विनाअट करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले़ परभणी येथील जि़प़ कर्मचाºयांनी छोटेखानी सभा घेऊन जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले़ आंदोलनात जिल्हा परिषदेतील कर्मचारी सहभागी झाले होते़संपास पाठिंबाजुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाºयांनी केलेल्या संपाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने पाठिंबा दिला असल्याची माहिती या संघटनेचे अध्यक्ष मधुकर कदम यांनी दिली़या संघटना संपात सहभागी९ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या संपामध्ये जि़प़तील महाराष्ट्र राज्य जि़प़ कर्मचारी संघटना, म़रा़ लेखा कर्मचारी संघटना, म़रा़ आरोग्य कर्मचारी संघटना, कास्ट्राईब महासंघ, विस्तार अधिकारी संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना या संघटनांसह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, आदर्श शिक्षक समिती, कास्ट्राईब शिक्षक संघटना या शिक्षक संघटनांनीही सहभाग नोंदविला होता़ म़रा़शासकीय, निमशासकीय, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले़

टॅग्स :parabhaniपरभणीzpजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समितीagitationआंदोलन