शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वाळू वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:17 IST

तालुक्यातील कुंभारी बाजार येथील दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरसह गावात उभ्या असलेल्या पाच ट्रॅक्टरवर तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील कुंभारी बाजार येथील दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरसह गावात उभ्या असलेल्या पाच ट्रॅक्टरवर तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून दुधना नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा सुरु होता. या अवैध वाळू उपस्याची कुणकुण तहसील प्रशासनाला लागल्यानंतर ग्रामीण पोलीस व महसूल प्रशासनाने अनेक वेळा रात्री- अपरात्री दुधना नदीपात्र गाठून कारवाई करण्याचा प्रयत्न केला; परंतु, वाळू माफियांचे स्ट्राँग नेटवर्कमुळे अधिकारी, कर्मचारी पोहोचण्याआधीच हे माफिया ट्रॅक्टर घेऊन पसार होत होते. ११ मे रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांसह ट्रॅक्टरमधून परभणी ते कुंभारी प्रवास केला. ट्रॅक्टरमध्ये अधिकारी आल्याने महसूल प्रशासनाची कारवाई खबºयांना लक्षातच आली नाही.पहाटे ३ वाजेच्या सुमारास गाव परिसरात वाळूची वाहतूक करणाºया तीन ट्रॅक्टरला जागेवरच पकडून तहसील कार्यालयात लावण्यात आले. त्यानंतर पहाटे ६ वाजेच्या सुमारास नदीपात्र परिसरात व गावात उभ्या असलेल्या पाच ट्रॅक्टर व ट्रॉलीचे पंचनामे केले. तहसीलदारांनी वेशभूषा बदलून केलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. या कामी पोलीस कर्मचारी रमेश गायकवाड, बीटजमादार दीपक भुसारे आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :parabhaniपरभणीTahasildarतहसीलदारsandवाळू