शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाणी पुरवठ्यात विजेचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:05 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी येथील पंप हाऊसमधील वीजपुरवठा रविवारी तीन तास खंडित राहिल्याने पाणी उपस्याचे काम ठप्प पडले होते़ परिणामी परभणीकरांना एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी येथील पंप हाऊसमधील वीजपुरवठा रविवारी तीन तास खंडित राहिल्याने पाणी उपस्याचे काम ठप्प पडले होते़ परिणामी परभणीकरांना एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़शहरात महापालिकेच्या नळ योजनेद्वारे सद्यस्थितीत १६ ते १७ दिवसांना एकवेळा पाणीपुरवठा केला जात आहे़ हा पाणीपुरवठा करताना वीज पुरवठ्याचा अडथळा मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याचे मनपाचे म्हणणे आहे़ राहटी येथील विद्युत पंपाच्या सहाय्याने बंधाºयातील पाण्याचा उपसा केला जातो़ २४ तास हे पंप सुरू असतात़ एका तासाला ९ लाख लिटर पाण्याचा उपसा पंपाच्या सहाय्याने होतो़ तीन तासांमध्ये सुमारे २२ लाख ५० हजार लिटर पाणी उपसा होतो़; परंतु, या भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणी उपसा करताना अडचणी निर्माण होत आहेत़तीन ते चार तास वीजपुरवठा बंद राहिला तर शहरातील जलकुंभात पाणीसाठा जमा होत नाही़ परिणामी, शहरवासियांचा पाणीसाठा एक दिवस पुढे ढकलला जातो़ त्यामुळे महापालिकेला पाण्याचे नियोजन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ शहरात निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता महावितरण कंपनीने टंचाईचे गांभिर्य लक्षात घेऊन राहटी परिसरातील वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीPower Shutdownभारनियमन