शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मानवतमध्ये पाण्यावरुन खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:21 IST

शहराच्या पाणीप्रश्नावरुन नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा प्रकार २० आॅक्टोबर रोजी सकाळी मानवत शहरात घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): शहराच्या पाणीप्रश्नावरुन नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा प्रकार २० आॅक्टोबर रोजी सकाळी मानवत शहरात घडला.मानवत शहराला झरी येथील तलावातून पाणी पुरवठा केला जातो. झरी तलावात मूबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र आठ ते दहा दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा विस्कळीत का झाला, याची विचारणा करण्यासाठी कॉंग्रेसचे नगरसेवक शनिवारी पालिकेमध्ये गेले. यावेळी मुख्याधिकाºयांना जाब विचारत असतानाच मुख्याधिकारी आणि नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी नगरसेवकांना आरेरावीची भाषा वापरली, असा आरोप कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे. या प्रकरणी नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडेच मुख्याधिकारी ढाकणे यांची तक्रार केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.झरी तलावामध्ये मूबलक प्रमाणात पाणी असताना नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ही बाब मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी आरेरावीची भाषा केली, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे. या निवेदनावर नगरसेवक शोभा चव्हाण, सरुबाई भदर्गे, संगिता देशमुख, अ.रहीम अ.करीम, स.जमील, विनोद रहाटे, गोपाल गौड, शैलेजा बारहाते, रबियाबी अन्सारी आदींच्या स्वाक्षºया आहेत.कृत्रिम पाणीटंचाईचे संकट४मानवत शहराला झरी येथील तलावातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या जायकवाडी प्रकल्पाचे पाणी कालव्याला सोडले असल्याने या पाण्याने झरी तलावात मूबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. साधारणत: मे महिन्यापर्यंत पुरेल एवढे पाणी तलावात असताना मानवतकरांना मात्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या शहरात आठ ते दहा दिवसांना एकवेळ पाणी येते.४झरी तलाव परिसरात एक्सप्रेस फिडर नसल्याने शहरवासियांना सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. झरी परिसरात एक्सप्रेस फिडर उभारावा, अशी अनेक दिवसांची मागणी आहे;परंतु, त्याकडेही नगरपालिका प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. परिणामी शहराला पाणीपुरवठा करताना अडथळे निर्माण होतात आणि दोन आवर्तनातील कालावधी वाढत चालला आहे.४शहराचा विस्तार वाढला असून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे. मात्र अनेक भागात हे काम ठप्प आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात विस्कळीतपणा निर्माण होत आहे. झरी बरोबरच जुन्या इरळद येथून पाणीपुरवठा करण्याची योजना कार्यान्वित केली तर शहराचा प्रश्न मिटू शकतो. मात्र यावरही हालचाली होत नाहीत.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई