शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

परभणी : सुविधा मिळत नसल्याने रुग्णांच्या यातनांत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:46 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी असलेल्या सुविधांचा अभाव निर्माण झाल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. विविध तपासण्या करण्यासाठी असलेल्या मशिनरी जुन्या झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी असलेल्या सुविधांचा अभाव निर्माण झाल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. विविध तपासण्या करण्यासाठी असलेल्या मशिनरी जुन्या झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे.येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. गोरगरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयातच उपचाराचा आधार मिळू शकतो. मात्र येथील जिल्हा रुग्णालय अनेक असुविधांनी ग्रासले आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. येथील एक्स-रे मशीन जुनी झाली असून या मशीनचा सध्या वापर होत नाही. त्यामुळे एक्स रे काढण्यासाठी रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागते. सोनोग्राफी करण्यासाठी मशीन उपलब्ध आहे. कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यामार्फत तपासण्या केल्या जातात. प्रसुती काळातील महिला रुग्ण तसेच इतर रुग्णांची सोनोग्राफी करावी लागते. मात्र रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची नियमित सोनोग्राफी होत असली तरी बाहेरहून आलेल्या रुग्णांसाठी मात्र सोनोग्राफीची तपासणी करुन दिली जात नाही, अशी रुग्णांची ओरड आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयातील या समस्यांबरोबरच स्वच्छता, इमारतींची दुरवस्था हे प्रश्नही रुग्णांना सतावत आहेत. जिल्हा रुग्णालयात नव्यानेच बालरुग्ण विभागांसाठी टोलेजंग इमारत बांधकाम करण्यात आले आहे; परंतु, या इमारतीच्या खिडक्या तुटल्या आहेत. फरशी अनेक ठिकाणी उखलडी आहे. त्यामुळे परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत असताना त्यांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. अत्यावश्यक सेवा असलेल्या या रुग्णालयात सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.परभणी जिल्हा रुग्णालयातून रुग्ण रेफर करण्याचे वाढले प्रमाण४येथील जिल्हा रुग्णालयात केवळ किरकोळ आजारांवरच उपचार केले जात आहेत. एखाद्या गंभीर आजाराचा रुग्ण दाखल झाल्यास त्याला सरळ नांदेड येथे हलविले जाते. त्यामुळे अनेक वेळा रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध होत नाहीत.४विशेष म्हणजे, जिल्हा सामान्य रुग्णालयात गंभीर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाºया सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचीही नेमणूक झाली आहे. असे असताना केवळ धोका का पत्करायचा या भूमिकेतून रुग्णांना नांदेड, औरंगाबाद या सारख्या शहरातील रुग्णांलयामध्ये रेफर केले जात आहे.४मागील वर्षभरापासून रुग्णांना रेफर करण्याचे प्रमाण वाढले असून रुग्णांच्या नातेवाईकांनी या विषयी अनेक वेळा तक्रारी करुनही रेफर करण्याचे प्रमाण कमी झाले नाही. इतर रुग्णालयात रेफर केल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा पैसा व वेळ जात आहे.रुग्णांसाठी विकतचे पाणी४जिल्हा रुग्णालय परिसरात रुग्णांसाठी पाण्याचीही सुविधा उपलब्ध नाही. याच भागात बुलढाणा अर्बन बँकेने शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभा केला असून तेथून पाणी विकत घ्यावे लागते.४ सध्या उन्हाळ्याचे दिवस असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिवसभरासाठी लागणारे पाणी चक्क विकत घ्यावे लागत आहे. रुग्णालय प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या भागात पाण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.या समस्याही भेडसावतात४जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणावर रक्ताची आवश्यकता भासते. मात्र रक्तपेढीत रक्तसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते.४रुग्णाला रक्ताची आवश्यकता असल्यास नातेवाईकांपैकी कोणीतरी रक्तदान केल्यानंतरच त्यास रक्त उपलब्ध होत आहे. रक्ताच्या समस्येबरोबरच जिल्हा सामान्य रुग्णालयात बेडची कमतरता भासत असून एका बेडवर दोन-दोन रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या सर्व समस्यांना निपटारा करावा, अशी मागणी आहे.४जिल्हा रुग्णालयातील किमान आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी रुग्णांतून होत आहे.डॉक्टरांची खाजगी सेवा४जिल्हा सामान्य रुग्णालयात गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांपैकी बहुतांश डॉक्टर खाजगी रुग्णालयात सेवा बजावत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील सेवेवर त्याचा परिणाम होत आहे.४ अनेक वेळा डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्याने रुग्णांनी रोषही व्यक्त केला आहे. शासकीय डॉक्टरांच्या खाजगी सेवा बंद कराव्यात, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून होत आहे; परंतु, त्यावर अजूनही ठोस पाऊले उचलली नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय सुरुच आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटल